Sharad Pawar, वाशी, नवी मुंबई : " सतिश मगर आज येथे उपस्थित आहेत. आधी पुण्यातील मगर पट्टा येथे उसाची शेती होती. हळूहळू शहर वाढायला लागली ताशी शेती कमी व्हायला लागली. नागरीकरण वाढत होते हे लक्षात घेऊन सतिश मगर यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यावेळी जमिनी विकण्याचा प्रकार मोठा होता. सतिश मगर यांनी जमीन विकण्यापेक्षा नवीन शहर निर्माण करता येईल का याचा विचार केला आणि त्याठिकाणी शेतकऱ्यांना एकत्र करून आयटी नगरी निर्माण केली आहे. आज राज्यांतील देशातील मुलं येथे येतात आणि देशाच्या संपत्तीमध्ये कष्ट करून वाढ करतात. आज याठिकाणी असणाऱ्या तत्कालीन शेतकऱ्यांना जमिनी न विकल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत आहेत", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Briged) राज्यस्तरीय अधिवेशन नवी मुंबईतील (Mumbai) वाशी येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.
आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी निर्माण करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे
शरद पवार म्हणाले, संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन आज पार पडलं. आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी निर्माण करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे. चौकटीच्या बाहेर हिंमत दाखवण्याची आता गरज आहे. शेती क्षेत्र, व्यवसाय यासह विविध क्षेत्रात काम करण्यासाठी संभाजी ब्रिगेड प्रेरणा देत असते. याठिकाणी सह्याद्री ऍग्रोचे विलास शिंदे बसले आहेत. नाशिकला गेलात की इथ नक्की जा. शून्यातून शेतकऱ्यांनी निर्माण केलेली ही कंपनी आहे. शेतकरी उत्पन्न काढतात आणि त्यावर तिथच प्रक्रिया करून जगभरात व्यवसास करतात. हे तुमच्यातील एक आहे. टाटा बिर्लाच्या घरातील ते नाहीत.
भारत हा शेतीप्रधान देश आहे. आता लोकसंख्या वाढत आहे माञ शेती कमी होतं आहे. अलीकडच्या काळात महामार्ग तयार करण्याची भूमिका सरकारने घेतली. जी जमिन जात यात ती शेतीची जाते. आता शेतीवर बोजा वाढत आहे. आपण स्वतंत्र झालो त्यावेळी 30 ते 35 कोटी आपली लोकसंख्या होती. आता कितीतरी पटीने संख्या वाढली आहे. आता आधुनिक शेती शिवाय पर्याय नाही. सध्या शेतीत प्रचंड संशोधन होतं आहे. याचा अभ्यास करायला हवा. त्या शिवाय शेती उत्पन्न वाढणार नाही, असंही शरद पवारांनी नमूद केलं.
केरळमध्ये गेलं की अनेकवेळा मला राम राम घालणारी लोकं भेटतात
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यात मी जात असतो. केरळमध्ये गेलं की अनेकवेळा मला राम राम घालणारी लोकं भेटतात. अनेकवेळा सांगली जिल्ह्यातील पार गावचे लोक मला तिथं भेटतात. त्या पार गावातील दुष्काळी भागातील लोक केरळला गेले. त्या गावातील लोकांचे आता बंगले आहेत. सांगली जिल्ह्यातील त्या भागातील अनेकांनी सर्कस सुरू केली. त्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी सर्कस कशी करायची शिकले. आज हे लोक भारतभर फिरतात इतकचं काय नेपाळपर्यंत ती गेली आहे. असच प्रकार सोने गाळणाऱ्या मराठी लोकांचा आहे. देशभरात अनेक ठिकाणीं ते व्यवसाय करत आहेत. त्यांनी एक वेगळी क्रांती केली आहे.
नव्या पिढीला सांगा काहीही करा पण निवडणुकीला उभे राहू नका
अमेरिकेत तुम्ही गेलात तर अनेक ठिकाणी गुजरात पंजाब राज्यांतील लोक तुम्हाला दिसतील. कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर जगात कुठंही जायची तयारी ठेवा. मी एकदा टोकियोला गेलो होतो. तिथं बळासाहेब देशमुख नावाचे गृहस्थ भेटले. त्याचं तिथं रेस्टॉरंट आहे. मी गेलो तिथं मी त्यांना म्हणालो तुम्ही देशमुख तुम्ही कसे काय हॉटेल व्यवसाय करताय. ते मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील होते. 1987 साली ते निवडणुकीला उभे राहिले ते निवडणूक हरले. लोकांचे पैसे द्यायला नव्हते कारण कर्ज झालं होतं. ते म्हणाले मी नोकरीसाठी जपानला आलो हळूहळू हॉटेल सुरू केलं. आता 8 रेस्टॉरंट त्यांची आहेत. त्यांना मी विचारलं नव्या पिढीला काय सांगू ते म्हणाले, नव्या पिढीला सांगा काहीही करा पण निवडणुकीला उभे राहू नका. नाहीतर कर्जबाजारी व्हाल.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी राजकीय उलथापालथ, पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा, नेमकं काय घडलं?