Maval Case : बदलापूरमधील (Badlapur) एका नामांकित शाळेत 3 वर्षीय चिरमुडींवर अत्याचार करण्यात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय. लाडकी बहीणचे 1500 नको पण आम्हाला सुरक्षा द्या, असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झालाय. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मावळमधील एका घटनेचा उल्लेख केलाय. आम्ही आरोपींना 2 महिन्यांच्या आत फाशी दिली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. मात्र, मावळमधील खटला निकाली जायला दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागलाय. दरम्यान, मावळमधील प्रकरण चर्चेत आल्यानंतर पीडित कुटुंबियांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कमीत कमी या गोष्टीचं तरी राजकारण करु नका, असं आवाहन मावळमधील पीडित कुटुंबियांनी राजकारण्यांना केलं आहे. 


बदलापूर अत्याचार प्रकरणात मावळची घटना चर्चेत, राजकारण थांबवा कुटुंबियांची मागणी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्याच्या मावळमधील अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली, असा दावा केला त्यावर आता राजकारण सुरू झालंय. 2 ऑगस्ट 2022 ला कोथुर्णे गावात सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मार्च 2024 मध्ये यातील आरोपी तेजस दळवीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आमच्या बाबतीत सरकार आणि प्रशासनाने गांभीर्य दाखवलं. पण आता यावरून जे राजकारण सुरू झालंय ते थांबवावं, अशी मागणी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी केलीये.


मावळमधील अत्याचार प्रकरणाचा घटनाक्रम जशाचा तसा  


बदलापुरात 3 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान, हे प्रकरण तापलेलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळमधील एका घटना फास्टट्रॅक चालवून आम्ही आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली, असा दावा केला. मात्र, हे प्रकरण निकाली लावण्यासाठी 1 वर्ष 7 महिने लागले होते. मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात असेच एक प्रकरण घडले होते. 2 ऑगस्ट 2022 रोजी 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आले होती. त्यानंतर 3 ऑगस्ट 2022 रोजी मृतदेह सापडला. कामशेत पोलिसांकडून आरोपीसह त्याच्या आईला 24 तासांच्या आत अटक करण्यात आली. जलदगीत न्यायालयाकडे प्रकरण वर्ग करण्यात आले. खटल्यात 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आणि उलटतपासणी करण्यात आली. 23 मार्च 2024 रोजी न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली.


इतर महत्वाच्या बातम्या 


Eknath Shinde : 2 महिन्यात फाशी दिल्याच्या दाव्याने वाद, मुख्यमंत्र्यांनी तो खटला स्वत: सांगितला!


मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली पुण्यातील घटना कोणती, 2 महिन्यात आरोपीला फाशी?; मिलिंद देवरांनी सांगितली स्टोरी