Sharad Pawar on PM Narendra Modi, Satara : "गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना एका भगिनीच्या घरात हल्ला झाला. अत्याचार केले गेले,त्यांच्या सास-यांची हत्या करण्यात आली. यात 11 वर्षांची शिक्षा झाली. मात्र, मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांची सुटका केली आणि गळ्यात हार घालून सन्मान केला. स्त्रीयांची अब्रू घेणा-यांचा सन्मान करण्याचं धोरण जे स्विकारतात ते देशाचे हितचिंतक असू शकत नाही. त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही", असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली. साताराच्या महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते.
सत्तेचा गैरवापर कसा करतात याची उदाहरणं त्यांनी दिली
शरद पवार म्हणाले, शशिकांत शिंदे हे कष्ठकरी कुटूंबातले आहेत. आज त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आह. तुमच्या पाठिंब्यावर ते यशस्वी होतील. हे भ्रष्टाचार घालवू म्हणतात, मात्र भ्रष्टाचार घालवायचा ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या कारवाई केली गेली. सत्तेचा गैरवापर कसा करतात याची उदाहरणं त्यांनी दिली. त्यांना धडा शिकवल्या शिवायची ताकत सातारकरांमध्ये आहे, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे पाईक आहोत
इंग्रजांच्या काळात सातारकर घाबरले नाहीत. मात्र,किरकोळ लोकांच्या समोर सुद्धा घाबरणार नाहीत. आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे पाईक आहोत. छत्रपतींच काय बोलायचं? कॉलर उडवायचं म्हणजे आधी सकाळ आहे का? संध्याकाळ आहे? हे बघावं लागतं. त्यांच्या विषयी जास्त बोलण्याचे कारण नाही. आम्ही गादीचा सन्मान करतो,पण मत देताना मत गादीला देत नाही, असंही शरद पवारांनी सांगितलं.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, देशातील शेतकरी वर्ग आज अस्वस्थ आहे. मिळालेली सत्ता ही त्यांच्यासाठी वापरायची असते. १० वर्षापूर्वी मी कृषी खाते सोडलं आणि मोदींचे राज्य आले. या दहा वर्षात त्यांनी शेतीसाठी काय केलं? आज देशातील शेती संकटात आलीये, अनेक प्रश्न निर्माण झालेत. दिल्लीत प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर देशभरातील शेतकऱ्यांनी शेतमालाला किंमती नीट मिळाव्यात यासाठी आंदोलन करायचं ठरवलं. याठिकाणी लोक हजारोंच्या संख्येने आले. यात केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांशी विचारविनिमय करेल अशी अपेक्षा होती. पण त्यांनी ढुंकून बघितलं नाही. पण पंजाबचा शेतकरी हा बहाद्दर होता. ही मंडळी संपूर्ण एक वर्ष याठिकाणी होती. शेवटी सरकारला नाईलाजाने हे धोरण मान्य करावे लागले. सरकारने शब्द दिला, निर्णय घेतले पण त्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे अनेक संकट वाढत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या