Congress Candidate joins BJP : गुजरातनंतर इंदुरमध्येही काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा धक्का बसलाय. इंदुर (Indore) लोकसभेतील काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. इतकचं नाही तर अक्षय बम हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 


कैलास विजयवर्गीय यांच्याकडून ऑपरेशन लोटस यशस्वी 


कैलास विजयवर्गीय यांनी काँग्रेस उमेदवारासोबतची सेल्फी शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. विजयवर्गीय सोशल मीडियावर लिहितात, काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात काम करत असलेल्या भाजपात स्वागत आहे. 


इंदुरमध्ये काँग्रेस उमेदवाराची माघार 


इंदुर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 25 एप्रिल होती. या मुदतीआधी काँग्रेसच्या अक्षय बम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारिख आज (दि.29) होती. काँग्रेसला काही माहिती मिळण्याआधीच अक्षय बम यांनी ऑपरेशन लोटसला प्रतिसाद उमेदवारी अर्ज मागे घेतला. इंदुर लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. 


काँग्रेस उमेदवाराकडे 14 लाखांचे घड्याळ 


मध्य प्रदेशच्या इंदुरमधून काँग्रेसच्या अक्षय कांती बम यांनी 24 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रतिज्ञापत्रात त्यांनी 57 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे काँग्रेस उमेदवाराकडे कोणतीही कार नाही. मात्र, त्यांच्याकडे 14 लाख रुपयांचे घड्याळ आहे. 


सुरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद 


गुजरातच्या सुरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरला. त्यामुळे भाजप उमेदवाराचा बिनविरोध विजय झाला आहे. निलेश कुम्भानी यांचा अर्ज सुरतमध्ये बाद ठरवण्यात आला होता. त्यामुळे भाजपला एकहाती यश मिळाले आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Narendra Modi : पद्मशाली समाजाचं मीठ खाऊन मोठा झालोय, या आधी सोलापूरला काहीतरी दिलंय, आता मागायला आलोय: पंतप्रधान नरेंद्र मोदी