शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं साथ सोडली, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Satish Chavan Will Joins Ajit Pawar NCP : सतीश चव्हाण शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
Satish Chavan Will Joins Ajit Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का बसलाय. आणखी एक नेता त्यांची साथ सोडणार आहे. आमदार सतीश चव्हाण यांची शरद पवार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलीये. सतीश चव्हाण (Satish Chavan) उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सतीश चव्हाण (Satish Chavan) हे विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना सोडून आले शरद पवार यांच्यासोबत आले होते. त्यावेळी आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांचे सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी पक्षाकडून हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे उद्या त्यांचा पक्ष प्रवेश पार पडणार आहे.
सुनील तटकरेंकडून सतीश चव्हाणांचं स्वागत
सुनील तटकरे म्हणाले, सतीश चव्हाण यांनी दि. 15/10/2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून ६ वर्षासाठी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेले होते. श्री. सतीश चव्हाण यांनी दि. 13/01/2025 रोजी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर व पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास व्यक्त करून पक्षाचे काम प्रामाणिकपणे करण्याचे समक्ष सांगितले असल्याने त्यांचे 6 वर्षासाठीचे निलंबन रद्द करण्यात येत आहे.
कोण आहेत सतीश चव्हाण?
सतीश भानुदासराव चव्हाण हे बी.ई मेकॅनिकलमध्ये पदवीधर आहेत. 1977 साला पासून कै. आ. वसंतराव काळे यांच्यासोबत विविध चळवळीत काम केले. सन 1984 सालापासून राजकीय क्षेत्रात काम करत आहे. सन 2008 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मराठवाडा पदवीधर मतदार संघातून विधान परिषद सदस्य म्हणून मी कार्यरत आहेत. त्यांनी शासनाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून देखील काम पाहिले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा सदस्य, सिनेट सदस्यपदी कार्य केले आहे. सध्या विधानमंडळाच्या अदाज समिती,सार्वजनिक उपक्रम समितीचा सदस्य, महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाचा सदस्य,परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा कार्यकारणी सदस्य, औरंगाबाद येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या