मुंबई : शरद पवारांच्या (Sharad Pawar) डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) चेहरा नक्कीच नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.


संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का? त्यांना हे कोणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात आहे. पवारांच्या डोक्यात काय चाललंय ते जर त्यांना कळलं असतं तर त्यांची आज अशी अवस्था झाली नसती. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


तेव्हा फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल


ते पुढे म्हणाले की, 2019 साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीस यांना कळलं नव्हतं. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच ना. आता 2024 साली तुमच्यात हिंमत असेल तर वेळेत निवडणुका घ्या, मग डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर हे समजेल तेव्हा फडणवीस यांचा मेंदू काम करायचा बंद होईल, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. 



नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? 


देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा आणि तोही माझा असावा, यासाठी तीन दिवस दिल्लीत जाऊन बसले. उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत असताना त्यांनी सोनिया गांधींबरोबर चर्चा केली. पण या बैठकीचा फोटो काढण्याची परवानगी गांधींनी दिली नाही. दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या हाती काहीही लागले नाही. आता शरद पवारांनी देखील म्हटलंय की, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही. त्यावर नाना पटोलेंनी देखील समर्थन दशवले आहे. उद्धव ठाकरेंच्या मनात जे होते, ते आता शक्य होताना दिसत नाही. पण मला असे वाटते की, शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे जवळजवळ शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. 


आणखी वाचा 


Maharashtra Politics : तुमचे आशीर्वाद मिळाले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, परिणय फुके यांचं नागपूरमध्ये वक्तव्य