Sanjay Raut on Sanjay Patil, Sangli : "खासदारकी ही सहकार सम्राट यांची मक्तेदारी नाही. चारित्र्यवान उमेदवार असेल तर लोक डोक्यावर घेतात,नोटा बरोबर वोट देखील देतात. चंद्रहार पाटील यांच्या सारखा शेतकऱ्याचा मुलगा नेतृत्व करू शकतो. सांगलीच्या खासदाराने संसदेत किती वेळा तोंड उघडले मला माहिती आहे", असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. सांगलीत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी संजय राऊत बोलत होते.


10 वर्ष खासदारकी भोगलेला माणसाला घरी बसवलं पाहिजे 


संजय राऊत म्हणाले,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. 10 वर्ष खासदारकी भोगलेला माणसाला घरी बसवलं पाहिजे. शिवसेना मराठी माणसाची शान आहे,शिवसेनावर संकट आले त्यावेळी वसंतदादा पाटील ठामपणे उभे राहिले. चंद्रहार पाटील,वसंतदादा यांचे स्वप्न पूर्ण करा, अस आवाहनही संजय राऊत यांनी यावेळी केलं. कुणी कितीही डरकाळी फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही. सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे फार आधीच प्रचाराला लागलेले आहेत . मिरजेमध्ये शिवसेनाप्रमुखांची प्रचंड सभा झाली.  आदित्य ठाकरे देखील जाणार आहेत. आज उद्या परवा मी देखील त्या भागात जाणार आहे. चंद्रहार पाटलांचाच विजय निश्चित होणार आहे.


पैशाच्या जीवावर आमची सत्ता घालवली


पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, यावेळी सांगलीला बदल हवा आहे. शेतकऱ्याचा  मुलगा संसदेत पाठवा. कोणताही वाद नाही. 10 वर्षे पासून मोदी सरकारचे आले आहे,तेंव्हा पासून सगळ्यात जास्त फटका महिलांना बसला आहे. 2 कोटी रोजगार देणार होते,पण  फक्त अमित शहा आणि अदानीला रोजगार गेला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते पण पैशाच्या जीवावर आमची सत्ता घालवली. त्याचा बदला घ्यावा लागणार, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. सांगलीत बदल झाला तर देशात बदल होईल. सांगली पासून सुरवात होईल, असेही राऊत यांनी सांगितले. 


विशाल पाटील यांच्या बद्दल आम्हाला  आस्था आहे. त्यांना आपण संसदेत पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सांगली आणि राज्यातील काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांची समजूत काढतील. शिवसेना विशाल पाटलांना संसदेत पाठवण्यासाठी पुढाकार घेईल. सांगलीबाबत काँग्रेससोबत अनेक पर्यायांची चर्चा केली आहे. मात्र, सांगलीची लोकसभा शिवसेनाच लढेल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलय.


इतर महत्वाच्या बातम्या 


Sanjay Raut : विशाल पाटील खासदार होतील, त्याची काळजी शिवसेना घेईल, पण सांगली आम्हीच लढवणार : संजय राऊत