सांगली : संजय राऊत (Sanjay Raut) आजपासून तीन दिवस सांगली (Sangli Lok Sabha) दौऱ्यावर आहे.  महाविकास आघाडीतला तिढा सुटतो की अधिक वाढणार जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सांगली लोकसभेची जागा शिवसेनाच लढवण्यावर ठाम असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. काँग्रेसच्या उमेदवाराला पंतप्रधान करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे काँग्रेसने सांगलीच्या जागेवर दावा करु नये असं राऊतांनी म्हटलंय. तसेच चंद्रहार पाटलांचाच विजय होणार, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे. ते सांगलीत बोलत होते.  तर सांगलीची चाचपणी करण्यासाठी राऊत सांगली दौऱ्यावर असल्याचं नाना पटोलेंनी (Nana PatoleP  म्हटलंय. सांगली आणि भिवंडीत असं काही करु नका असं म्हणत नाना पटोलेंनी पुन्हा एकदा सांगलीवर दावा केलाय.


संजय राऊत म्हणाले.   विशाल पाटील यांच्या संदर्भात आस्था आहे. त्यांना संसदेत पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सांगलीतलं आणि राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे त्या भागातील कार्यकर्त्यांची समजूत काढतील. विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि त्यासाठी पुढाकार शिवसेना घेणार आहे. सांगलीच्या बाबतीत काँग्रेसशी अनेक पर्यायांची चर्चा, पण सांगली लोकसभा आम्हीच लढणार आहे. मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे . प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात आघाडी असते तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा मनोमन असते.


एकमेकांना हातभार लावला पाहिजे: संजय राऊत


रामटेक हा आमचा परंपरागत मतदार संघ आहे आमच्या शिवसैनिकांना वाटत होतं की तो मतदारसंघ आमच्याकडे असावा पण आम्ही त्यांची समजूत काढली आणि तो मतदार संघ काँग्रेसला दिला.  छत्रपती शाहू महाराजांचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला दिला आमच्याही कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी हट्ट होता पण आम्ही त्याची समजूत काढली. महाराष्ट्रात किमान 35 प्लस जागा निवडून आणण्याचा मिशन आहे. त्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना हातभार लावला पाहिजे, असेही राऊत म्हणाले.  


चंद्रहार पाटलांचाच विजय निश्चित होणार : संजय राऊत


संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीचे लोक प्रचाराला लागलेलो आहे . आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार शिवसेनेचा आहे . वेळ न दवडता आपण मतदारांमध्ये जायला हवं . महाविकास आघाडीचे वातावरण हे झंजावात असावा त्या पद्धतीचा दिसत आहे . कुणी कितीही डरकाळी फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही . सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे फार आधीच प्रचाराला लागलेले आहेत . मिरजेमध्ये शिवसेनाप्रमुखांची प्रचंड सभा झाली.  आदित्य ठाकरे देखील जाणार आहेत. आज उद्या परवा मी देखील त्या भागात जाणार आहे. चंद्रहार पाटलांचाच विजय निश्चित  होणार आहे. 


हे ही वाचा :


'सांगली'वरून महाविकास आघाडीमध्ये पहिली ठिणगी! काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही, विश्वजित कदमांचा टोकाचा निर्णय