एक्स्प्लोर

Sanjay Raut: ठाणेकरांची वाट लावण्याच्या पापात सहभागी होऊ नका; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र, 8 मागण्या!

Sanjay Raut: संजय राऊत यांनी ठाण्यातील प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटरबाबत नागरिकांच्या आक्षेपांची दखल घेऊन स्वतंत्र तांत्रिक तपासणी तसेच प्रकल्पाचा फेरविचार करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

Sanjay Raut: ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाण्यातील प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटरबाबत नागरिकांच्या आक्षेपांची दखल घेऊन स्वतंत्र तांत्रिक तपासणी तसेच प्रकल्पाचा फेरविचार करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे. ठाण्यात येत असलेल्या प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटरला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. ठाण्याच्या निवासी भागात उभारण्यात येणारे डेटा सेंटर म्हणजे जनतेवर लादलेले संकट आहे, असं संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हा मुद्दा फक्त तांत्रिक किंवा उद्योगाशी संबंधित राहिलेला नसून स्थानिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला मुद्दा बनला आहे. 

आदित्य ठाकरे यांनी सदर 'डेटा सेंटर'बाबत वारंवार आवाज उठवून सरकारला संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली आहे. ठाण्याच्या निवासी क्षेत्रात 54 एकर क्षेत्रावर हा प्रकल्प लादला जात असून याबाबत येथे राहणाऱ्या हजारो जनतेशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधलेला नाही. या 'डेटा सेंटर'चे दुष्परिणाम नागरिकांना व त्यांच्या पुढच्या पिढीला भोगावे लागतील. याबाबत आवाज उठविणाऱ्या नागरिकांना धमक्या देणे, दहशत निर्माण करणे असे प्रकार सुरू झाले आहेत. ठाण्यातील बदनाम राजकारणी त्यांच्या स्वार्थासाठी हा प्रकल्प आणत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.  तसेच ठाणेकरांची वाट लावण्याच्या पापात सहभागी होऊ नका ही विनंती, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून कोणत्या मागण्या केल्या?

  1. ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, संबंधित वीज वितरण कंपनी, पाणीपुरवठा यंत्रणा आणि प्रकल्प प्रवर्तक यांची संयुक्त बैठक नागरिकांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित करावी.
  2. प्रकल्पाला दिलेल्या बांधकाम, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, वृक्षतोड आणि पर्यावरणीय परवानग्यांचा सर्व तपशील सार्वजनिक करावा. कोणत्या परवानग्या सध्या लागू आहेत अथवा नाहीत, याचा कायदेशीर आधारही स्पष्ट करावा.
  3. प्रकल्पाचा दैनंदिन व कमाल पाणी वापर, पाण्याचा स्रोत, पुनर्वापराचे प्रमाण आणि शीतकरण तंत्रज्ञान यांची स्वतंत्र तज्ज्ञांकडून पडताळणी करावी. 'वॉटर-फ्री कूलिंग'चा दावा नेमक्या कोणत्या प्रक्रियेपुरता लागू आहे, हे स्पष्ट करावे.
  4. प्रकल्पाची कमाल वीज मागणी, स्वतंत्र वीजपुरवठ्याची व्यवस्था आणि परिसरातील वीज वितरण जाळ्यावर होणारा परिणाम यांचा तपशील जाहीर करावा. त्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचा खर्च कोण उचलणार, हेही स्पष्ट करावे.
  5. निवासी इमारतींवरील संभाव्य ध्वनी व वायु प्रदूषणाच्या परिणामांची तपासणी करावी. बॅकअप जनरेटर, शीतकरण यंत्रणा आणि बांधकामातून होणाऱ्या प्रदूषणासाठी लागू मर्यादांचे पालन सुनिश्चित करावे.
  6. नागरिकांच्या प्रश्नांना प्रकल्प प्रवर्तक व संबंधित अधिकाऱ्यांनी थेट उत्तरे देण्यासाठी खुली सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी. बैठकीचे इतिवृत्त, दिलेली आश्वासने आणि त्यांच्या पूर्ततेची कालमर्यादा प्रसिद्ध करावी.
  7. परवानग्यांच्या अटींचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कामावर नियमानुसार निर्बंध घालून सुधारणा पूर्ण झाल्यानंतरच पुढील कार्यवाहीस परवानगी द्यावी.
  8. महाराष्ट्रातील डेटा सेंटरसाठी पाणी, वीज, ध्वनी, उत्सर्जन आणि निवासी परिसरावरील परिणाम यांबाबत स्पष्ट राज्यस्तरीय मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत. मुळात अशा डेटा सेंटरच्या उभारणीची आज गरज आहे काय यावर चिंतन व्हावे. तोपर्यंत ठाण्यातील डेटा सेंटरला स्थगिती द्यावी.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Sanjay Raut: बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात; अमित शाहा हेच लॉरेंस बिश्नोई...., संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News:
"नेण्या-आणण्याची सोय करू"; मतदान केंद्र 17 किमी दूर गेल्याने तक्रार करणाऱ्या माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
MPSC Student Protest: पदभरती कधी करणार? MPSC विद्यार्थ्यांकडून राज्यातील अनेक मंत्री अन् अधिकाऱ्यांना फोनचा तगादा; मेलबॉक्सही फुल, नेमकं प्रकरण काय?
पदभरती कधी करणार? MPSC विद्यार्थ्यांकडून राज्यातील अनेक मंत्री अन् अधिकाऱ्यांना फोनचा तगादा; मेलबॉक्सही फुल, नेमकं प्रकरण काय?
Ramdas Kadam and Manoj Jarange: बाथरुममध्ये जाऊन खातो, कोण आहेस रे तू; रामदास कदम खोलात गेले, मनोज जरांगे म्हणाले, अरे थोरली बेगम...
बाथरुममध्ये जाऊन खातो, कोण आहेस रे तू; रामदास कदम खोलात गेले, मनोज जरांगे म्हणाले, अरे थोरली बेगम...
Sanjay Raut: बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात; अमित शाहा हेच लॉरेंस बिश्नोई...., संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात; अमित शाहा हेच लॉरेंस बिश्नोई...., संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

व्हिडीओ

Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News:
"नेण्या-आणण्याची सोय करू"; मतदान केंद्र 17 किमी दूर गेल्याने तक्रार करणाऱ्या माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात; अमित शाहा हेच लॉरेंस बिश्नोई...., संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात; अमित शाहा हेच लॉरेंस बिश्नोई...., संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
Ramdas Kadam and Manoj Jarange: उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
Satej Patil : गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
जुन्या बसस्थानकासमोर तरुणाला धारधार कोयत्याने भोसकले; हल्ला होताच आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर; लातूरमध्ये खळबळ
जुन्या बसस्थानकासमोर तरुणाला धारधार कोयत्याने भोसकले; हल्ला होताच आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर; लातूरमध्ये खळबळ
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार? महायुती अन् महाविकास आघाडीत बैठकांचा जोर
सांगली जिल्हा बँकेची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार? महायुती अन् महाविकास आघाडीत बैठकांचा जोर
Thane Crime Chena Forest: बॅटरीच्या प्रकाशाला प्राण्याचे डोळे समजून गोळी झाडली, घोडबंदरच्या चेना जंगलात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरसह सहा जणांना अटक
बॅटरीच्या प्रकाशाला प्राण्याचे डोळे समजून गोळी झाडली, घोडबंदरच्या चेना जंगलात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरसह सहा जणांना अटक
Embed widget