मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत रविवारी ‘लखपती दीदीं’चा (Lakhpati Didi) मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जळगाव (Jalgaon) विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 


संजय राऊत म्हणाले की, मोदी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आले आहेत. युक्रेन,पोलंड, रशिया तिकडे देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला गेले होते. जळगावला देखील त्याच कामासाठी आले आहेत. निमित्त आहे लखपती दीदी. ज्या देशात लाखो बेरोजगार आहेत त्यांना देखील लखपती करण्याची गरज आहे. महिलांना पैसे दिले जातात आणि मुख्यमंत्री विचारत आहेत पैसे मिळाले ना पैसे मिळाले ना, ही काय पद्धत झाली का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 


पहिले तुम्ही आमच्या दीदींना सुरक्षा द्या


सरकारच्या बापाच्या पैसे आहेत का? लखपती दीदी आणि जनतेचा पैसा आहे. प्रधानमंत्री येत आहेत. महाराष्ट्रात एक आंदोलन सुरू आहे. आमच्या बहि‍णींच्या सुरक्षेबाबत प्रधानमंत्री यांनी अजून एकही शब्द काढला नाही.  ज्या जळगावात प्रधानमंत्री जात आहेत त्याच जळगावात पंधरा दिवसात चार जणांवर अत्याचार झाला. याबाबत प्रधानमंत्र्यांना कोणीतरी जाऊन सांगा. पहिले तुम्ही आमच्या दीदींना सुरक्षा द्या. प्रधानमंत्री फिरत राहतील आणि आमच्या बहिणी न्यायासाठी इकडून तिकडे फिरत राहतील, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. 


99 टक्के जागांवर आमची सहमती 


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत संजय राऊत म्हणाले की, कोण काय आमचे सहकारी सांगत आहे. त्याच्याविषयी आम्ही काहीच बोलणार नाही.  काल महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख पक्षाची बैठक पार पडली. 99 टक्के जागांवर आमची सहमती झाली आहे. मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे. तिथे कायम मराठी माणसाचे वर्चस्व राहिले आहे. हे मुंबई तोडण्याची लचके तोडण्याचे कारस्थान सुरू आहेत. त्याला शह देण्यासाठी मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात असणे गरजेचे आहे. त्याच संदर्भात जागा वाटपाटपाबाबत आम्ही चर्चा करत आहोत आणि महाविकास आघाडी म्हणून हीच लढाई आहे. म्हणून कोणाच्या पोटात दुखत असेल त्याने त्याच्या दुखण्यावर औषध द्यावं. काल मुंबईचा विषय जवळजवळ संपत आलेला आहे आणि आता 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 


आणखी वाचा 


महाराष्ट्र बंदच्या निर्णयावरून संजय राऊतांचा न्यायालयावर निशाणा, आता उदय सामंतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी; म्हणाले...