'अजित पवारांचा बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी पराभव करतील'; विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांचं मोठं भाकीत!
Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवारांचा बारामतीत लाडक्या बहीण पराभव करतील, असे भाकीत संजय राऊत यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Sanjay Raut on Ajit Pawar : यंदाच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (CM Ladki Bahin Yojana) घोषणा केली आहे. या योजनेची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा असून विरोधकांनी या योजनेवरून महायुती सरकारवर (Mahayuti Government) जोरदार निशाणा साधलाय. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लाडकी बहीण योजनेवरून थेट अजित पवारांचा (Ajit Pawar) बारामतीत लाडक्या बहीण पराभव करतील, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सोमवारी महायुतीमध्ये असलेले अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. पण जर आशीर्वाद दिला नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन, असे वक्तव्य केले होते. रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय राऊतांनी रवी राणा यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
पैसे त्यांच्या खिशातून आले आहेत का?
संजय राऊत म्हणाले की, सरकारने जाहीर केलेल्या या योजना लाडक्या बहिणींसाठी नाहीत. त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी आहेत. त्यांच्या आणि त्या सरकाराला पाठिंबा देणाऱ्यांच्या भावना किती कलुषित आहे? हे पैसे त्यांच्या खिशातून आले आहेत का? हे पैसे काढून घेणारे तुम्ही कोण आहात? रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा पराभूत झाल्या आहेत आणि ते असे बोलत आहेत. पैसे काय यांच्या बापजाद्यांचे आहेत का? यांची मानसिकता सरकारी पैशाने वोट विकत घ्यायची आहे. मात्र आमची सत्ता आली तर आम्ही योजनेचे पैसे वाढवू, असे त्यांनी म्हटले.
बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी अजित पवारांचा पराभव करतील
ते पुढे म्हणाले की, अजित पवार हे स्वतः बारामतीत पराभूत होणार आहेत. त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करतील. सगळे गद्दार आता विधानसभेत दिसणार नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील. आमदारांना 50 कोटी, खासदारांना 100 कोटी तर नगरसेवकांची किंमत 5 कोटी आणि आमच्या लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये देता का? मते दिली नाहीत तर ते पैसे परत घेण्याची भाषा करतात, असे टीका संजय राऊत यांनी यावेळी केली आहे.
आणखी वाचा
Ajit Pawar: मोठी बातमी : बहीण सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्राला उभं करणं मोठी चूक होती : अजित पवार