एक्स्प्लोर

Sanjay Raut Hospitalized: पत्रकार परिषद संपताच संजय राऊतांची प्रकृती बिघडली, तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल

Sanjay Raut Hospitalized: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Sanjay Raut Hospitalized: मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील भांडुप (Bhandup) इथल्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये (Fortis Hospital) संजय राऊत (Sanjay Raut) यांना दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टिज हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी केली होती.  सध्या संजय राऊत यांची प्रकृती स्थिर आहे. अस्वस्थ वाटत असल्याने तातडीने फोर्टिज रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

सकाळीच संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, असं वक्तव्य केलं. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये संजय राऊतांनी मोठी भूमिका बजावली आहे. तसेच, गेल्या कित्येक दिवसांपासून संजय राऊत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत सातत्यानं वक्तव्य करत आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूनं पक्षाची भूमिकाही प्रभावीपणे मांडत आहेत.                                        

संजय राऊत शिवसेनेची धडाडणारी तोफ (Sanjay Raut Hospitalized)

संजय राऊत हे शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यापासून संजय राऊत हे सातत्याने प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात आणि विरोधकांवर आगपाखड करण्याचे काम संजय राऊत एकहाती करत असतात. दररोज सकाळी नियमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडतात. राऊतांच्या या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी महायुतीने अनेक नेत्यांची फौज तैनात केली होती. मात्र, संजय राऊत या सर्व नेत्यांना पुरुन उरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

संजय राऊत यांना आज अचानक रुग्णालयात का दाखल केले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आता डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत काय माहिती देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.        

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Nagpur :आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...
आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
Abhijeet Dipke Parents: मोदींना देवाने सद्बुद्धी द्यावी, ते कुणाच्या मरणाची वाट पाहतायत? लेकरू नाही, बायको नाही, कसली दया, माया नाही ते..., दिपकेंच्या आई-वडीलांचा संताप, उपोषणाला बसणार
मोदींना देवाने सद्बुद्धी द्यावी, ते कुणाच्या मरणाची वाट पाहतायत? लेकरू नाही, बायको नाही, कसली दया, माया नाही ते..., दिपकेंच्या आई-वडीलांचा संताप, उपोषणाला बसणार

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Embed widget