Sanjay Pawar on Virendra Mandlik , Kolhapur : कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका केली होती. "छत्रपती कुटुंबाने (Chhatrapati Family) राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांच्या नावाला साजेसं काम केलं नाही. छत्रपती कुटुंबाने नावाला साजेसं काम केलं नाही, ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी केलय. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एक ही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकले नाहीत. गेल्या 12 ते 15 वर्षांपासून बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आलेली नाही,",असं वीरेंद्र मंडलिक (Virendra Mandlik) यांनी म्हटलं होते. दरम्यान वीरेंद्र मंडलिकांच्या टीकेला ठाकरे गटाचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले संजय पवार ?
वीरेंद्र मंडलिकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय पवार (Sanjay Pawar) म्हणाले, छत्रपती घराण्यावर बोलणाऱ्या वीरेंद्र मंडलिक यांचं वय काय? त्यांचं वय पाहाता त्यांनी छत्रपतींवर टीका करणे योग्य नाही. राजकारणात तुमचे बाबा प्रतिस्पर्धी म्हणून आम्हाला मान्य आहेत. इकडे छत्रपती उमेदवार आहेत, आम्हाला मान्य आहे. त्यांनी टीका केली तर ठीक आहे. पण कुणी कुणावर टीका केली पाहिजे याचं भान ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या टीकेमुळे छत्रपतींचा विजय सोपा झालेला आहे. अशा टीकेमुळं आमची लीड वाढणार आहे. खरा प्रश्न हा आहे की, तुमचे बाबा असताना त्यांनी कोल्हापूरसाठी काय केलं? किती विकासाचे मुद्दे आणले? जनतेशी किती संपर्क ठेवला? असे सवाल संजय पवार यांनी केले.
बंटी पाटील आणि उद्धव ठाकरेंशीही तुम्ही असेच वागले
शिवाय कागलच्या महाराजांनी यांच्यापासून सावध राहावे, असंही संजय पवार यांनी म्हटलं आहे. निवडणुकीपुरता मतदारांचा, कार्यकर्त्यांचा छत्रपतींचा वापर करणे, यांचा जुना ट्रेंड आहे. त्यामुले समरजीत राजेंनी सुद्धा सावध राहाणे गरजेचे आहे. विधानसभेला हीच मंडळी तुम्हाला विरोध करतील. बंटी पाटील आणि उद्धव ठाकरेंशीही तुम्ही असेच वागले आणि आत्ताही तुम्ही तेच करत आहात, कोल्हापूरच्या जनतेने तुम्हाला चांगलं ओळखलं आहे, असंही संजय पवार (Sanjay Pawar) म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या