Sharad Pawar on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारासाठी दोन सभा झाल्यात. या सभेतील भाषणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान हल्लाबोल केला आहे.  


आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. शरद पवार म्हणाले की, देशाचं राजकारण योग्य रस्त्यावर आणायचं पाहिजे. यासाठी देशपातळीवर आघाडी केली आहे. त्यासाठी पक्ष, खासदार नेते एकत्र आले आहेत. 


मोदींनी राष्ट्रीय दृष्टीकोन ठेवावा 


इथे येण्यापूर्वी मी मोदी साहेबांचे भाषण ऐकत होतो. देशाचा प्रधानमंत्री हा देशाचा असतो. मात्र भाषण ऐकल्यावर असे वाटले की, ते भाजपचे पंतप्रधान आहेत. त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असा टोला त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. 


तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तर तुम्ही काय केले हे सांगितले पाहिजे


ते पुढे म्हणाले की, माझ्या हातात सत्ता द्या ५० दिवसांत महागाई कमी करू असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पण महागाई कमी करण्याऐवजी वाढतच गेली. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यात. देशात आज बेरोजगारांची संख्या वाढली आहे. कधी नेहरू तर कधी राहुल गांधींवर टीका करणे हे सध्या सुरू आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तर तुम्ही काय केले हे सांगितले पाहिजे. 


100 पैकी 87 मुले आज बेरोजगार 


आज शेतीला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. शाळा कॉलेजमधून बाहेर पडलेले 100 पैकी 87 मुले आज बेरोजगार असल्याचे सर्वेक्षण आहे. फळबाग योजना आम्ही सुरू केली होती. आज पाणी नसल्यानं त्या फळबागा जळत आहेत. मात्र देशाचे पंतप्रधान, मंत्री याकडे ढुंकूनही बघत नाहीत. राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. हे सत्तेचा गैरवापर करण्यासाठीच सत्ता वापरतात.  


संसदीय लोकशाही संकटात आलीय


आज मूलभूत अधिकार संकटात आले आहेत. संसदीय लोकशाही संकटात आली आहे. पंतप्रधानांच्या विरोधात बोलले म्हणून एक आदिवासी राज्यातील मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना अटक करण्यात आली. टीका केली तर राज्यकर्त्यांना तुरुंगात टाकतात. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. लोकशाही वाचवण्यासाठी, मूलभूत हक्कासाठी आपल्याला उत्तर द्यावे लागेल, असे ते म्हणाले.


आणखी वाचा 


Video: माझा लहान भाऊ म्हणत मोदींनी भर मंचावर शिट्टी दिली, महादेव जानकरांनी जोरजोराने वाजवली