सांगली : महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi Seat Sharing)  सांगलीच्या (Sangli Lok Sabha Election) जागेवरुन मोठी ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंनी (Shiv Sena Uddhav Thackeray)  उमेदवार जाहीर केल्यानंतरही  सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस पक्ष अजूनही ठाम आहे.  मात्र विशाल पाटील (Vishal Patil) यांना लोकसभेऐवजी राज्यसभेवर पाठवण्याच्या पर्यायावर सध्याा मविआचे नेते (Maha Vikas Aghadi)  विचार करत असल्याचं  माहिती समोर आली आहे.  विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवल्याने विशाल पाटील आणि काँग्रेस नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांची यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडीकडून पर्याय  काँग्रेस पक्षाला देण्यात आल्याची माहिती आहे.  


सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.   विशाल पाटील यांचा यामध्ये विशेष विचार करून त्यांचं राजकीय पुनर्वसन  कशाप्रकारे करता येईल यासाठी यासाठी महाविकास आघाडीने हा पर्याय काढला आहे राज्यसभेव्यतिरिक्त दुसरा पर्याय देखील विचाराधीन आहे, आणि तो म्हणजे विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल.. यावर अंतिम निर्णय काय होतो ते पाहायचं. 


काय आहे महाविकास आघाडीचा प्लान?


लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भातील पर्याय  किंवा पुढे विधानसभा  निवडणुकीत विशाल पाटील उमेदवार असल्यास त्यांना पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय  नेत्यांकडून घेतला जातोय. महाविकास आघाडीच्या  नेत्यांकडून अशा प्रकारचा प्रस्ताव  दिल्लीतील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना  पाठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून  या संदर्भात  प्रतिसाद अद्याप आला नसल्याची माहिती आहे. तर काँग्रेस पक्षांकडून या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि या प्रस्तावावर विशाल पाटील यांची नाराजी दूर झाली तर महाविकास आघाडी एकत्रित चंद्रहार पाटील यांचा प्रचार करेल अशी अपेक्षा महाविकास आघाडीचे नेत्यांना आहे.   


संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्याला काँग्रेस नेत्यांची पाठ


सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते दौऱ्याला पाठ फिरवली आहे. विशाल पाटील हे मुंबई आहेत तर,विश्वजीत कदम हे पुण्यात आहेत.  सांगली जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष विक्रम सावंत हे जत या मतदार संघात आहेत. सांगली लोकसभा मतदार संघावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे.   या लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी मधे मैत्रीपूर्ण लढत घेण्यात यावी असा प्रस्ताव राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिला होता पण त्यावर अजून दिल्लीतील काँग्रेस नेत्यांकडून उत्तर आलं नाही आहे. सांगलीतील काँग्रेस नेत्यांची ठाकरे गटावर नाराजी आहे. 


हे ही वाचा :


Sanjay Raut : विशाल पाटील खासदार होतील, त्याची काळजी शिवसेना घेईल, पण सांगली आम्हीच लढवणार : संजय राऊत