Actor Govinda On Lok Sabha Election :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेते गोविंदा (Govinda) आता प्रचाराच्या रणधुमाळीत उतरला आहे. रामटेकमधील (Ramtek) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे (Raju Parve)  यांच्या प्रचारासाठी आज सकाळी गोविंदा नागपुरात दाखल झाले. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या निवडणूक उमेदवारीबाबत ही भाष्य केले. 


काँग्रेसचे माजी खासदार असलेले गोविंदा यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी वायव्य मुंबई मतदारसंघातून गोविंदा यांना उमेदवारी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर गोविंदा यांना त्यांच्या विरोधात उभे करणार असल्याची चर्चा होती. 


मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?


रामटेक लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेनेच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी दाखल झालेल्या गोविंदा यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. माझा रेकॉर्ड चांगला असून मी जिथे जातो तिथे विजय मिळतो असेही त्यांनी सांगितले. मुंबईतून आपण निवडणूक लढवणार का असा प्रश्न गोविंदा यांना विचारले असता, त्यांनी आपण तिकीट मागितले नाही आणि निवडणूक लढवण्याबाबत काहीही चर्चा केली नसल्याचे गोविंदा यांनी स्पष्ट केले. माझ्यासाठी ही नव्याने सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. शिवसेनेच्या प्रचाराची दखल घेतली जाईल असा विश्वासही गोविंदा यांनी व्यक्त केला. 


14 वर्षानंतर राजकारणात कमबॅक 


जवळपास 14 वर्षानंतर गोविंदाने राजकारणात पुनरामगन केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गोविंदाने प्रवेश केला. गोविंदाच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही एखाद्या चित्रपटाला साजेशी ठरली. मात्र, त्याच्या खासदारकीचा टर्मचा क्लायमॅक्स हा 'खलनायकी' ठरला. लोकांना उपलब्ध न होणारा, मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलेला खासदार अशी गोविंदाची चर्चा होऊ लागली.  2004 मध्ये मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून गोविंदाला उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री राम नाईक यांचा पराभव केला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :