Lok Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात महत्वाचा जिल्हा समाजाला जाणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha Constituency) भाजपकडून (BJP) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, बजरंग सोनवनणेंना उमेदवारी जाहीर होताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. 'बीडची जनता फार सुज्ञ असून, बजरंग सोनवणे यांना तिकीट जाहीर झाले असेल तर त्यांना शुभेच्छा' असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तर, ज्योती मेटे यांचा पत्ता कट झाल्याने यावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीवर बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “त्यांना तिकीट जाहीर झाले असेल, तर त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा आहे. माझी निवडणुकीची तयारी ही नुसती निवडणूक जाहीर झाल्यावर सुरु होत नाही, पाचही वर्ष चालू असते. ज्या पद्धतीचा संपर्क, ज्या पद्धतीचं काम, ज्या पद्धतीने समाजाच्या कामी येणार आहे. प्रीतम ताई सुद्धा फिरत होते काम करत आहेत, असे पंकज मुंडे म्हणाल्या आहेत. 


बीडची जनता फार सुज्ञ आहे...


आता आमचे मित्र पक्ष देखील काम करत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्याचे हे निमित्त आहे. कोणत्याही उमेदवाराला आपला विजय होणार असे वाटणं आवश्यक असतं, जसं त्यांना वाटतं तसं मलाही वाटत आहे. आता हा वेगळा विषय झाला, तुम्ही पाच वर्षे लोकांसाठी काय करता, मतदारांशी भेटता की नाही या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. बीडची जनता फार सुज्ञ आहे आणि ती नक्कीच विचार करतील, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.


ज्योती मेटे त्याचं त्या ठरवतील...


ज्योती मेटे यांनी काय करावं याबद्दल त्याचं त्या ठरवतील. मी काही बोलू शकत नाही. नेमकं काय करायचं याबद्दल त्यांचे अनुयायी आणि ते ठरवतील. राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नसून, तरीही मी निवडणूक लढवणार असल्याची त्यांची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे त्यांनी लढायची भूमिका ठेवली असेल, तर ती त्यांची सर्वस्वी भूमिका आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. 


तिकिटांच्या आदलाबदलीवर टीका टिपणी करणार नाही...


तिकिटांच्या आदलाबदलीवर बोलतांना पंकजा मुंडे म्हणलाय की, मी सुद्धा या चर्चा ऐकत आहे. मात्र, त्या प्रक्रियेचा पूर्ण भाग नसल्यामुळे मी टीका टिपणी करणार नाही. मी माध्यमातून बघत असते आणि माध्यमातून प्रत्येक गोष्टीवर फार फार बोलणं आवश्यक नसतं.


आमच्या युतीत राष्ट्रवादी पक्ष आलेला आहे...


माझी तयारी ही नेहमीसारखीच सुरू आहे. आमच्या युतीत राष्ट्रवादी पक्ष आलेला आहे. त्यांच्याबरोबर सुद्धा वेगवेगळ्या बैठकी आमच्या सुरू आहेत. त्यांचा जो पॅटर्न आहे आणि आमचा जो पॅटर्न आहे या दोन्हीमध्ये जे वेगळेपण आहे, त्याला कसं एकत्र ठेव्याचं याचा प्रयत्न मी नेहमी करत असते. मला वाटतं त्यांनी आणि मी अधिकची ताकद देऊन निवडून येऊ असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. 


आम्ही राजकारणात बोलतो तेव्हा बहीण भाऊ नसतो...


माझा आणि धनंजय मुंडे यांचा संभाषण सुरू होऊन अनेक वर्ष झालेली आहे. त्यामुळे ते माध्यमांसाठी सुद्धा नवीन नाही. जेव्हा आम्ही राजकारणात बोलतो तेव्हा बहीण भाऊ नसतो, तर राजकीय नेते असतो. एक वेगवेगळ्या लेवलवर काम करत असतो. मी सुद्धा काम केलेला आहे, मात्र मध्यंतरीच्या काळात माझ्यामध्ये थोडा ब्रेक झाला होता असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. 


राज्याच्या बाहेरील सभेचा पक्षाचा निरोप...


मी 2014 मध्ये देखील स्टार प्रचारक होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असताना मी युवा मोर्चाचे अध्यक्ष असल्याने स्टार प्रचारक होते. त्यामुळे आता सुद्धा राज्याच्या बाहेरच्या सभा लागण्याची पक्षाचा निरोप मला आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Sharad Pawar Camp: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, बीडमधून बजरंग सोनावणे, भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी