सांगली : उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष लढत असलेले उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी चंद्रहार पाटलांवर (Chandrahar Patil) टीका केलीय. संजयकाकांनी डावपेच करून स्वतःच्या विरोधात खोटा पैलवान उभा केलाय; पण संजय काकांना पाडू शकणारा खरा पैलवान आता निवडणुकीत उतरलाय अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिलीय. तर बाकीचे सगळे उमेदवार गौण आहेत, असंही विशाल पाटील म्हणालेत. तसंच त्यांच्या याच टीकेला चंद्रहार पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. विशाल पाटील हे भाजपची टीम बी आहे. त्यांना भाजपकडून पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर विशाल पाटील अपक्ष निवडणूक (Sangli Lok Sabha Election) लढवत आहेत.
चंद्रहार पाटील म्हणाले, विशाल पाटील हे भाजपची टीम बी आहे. भाजपकडून पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे. महाविकस आघाडीतून तुम्ही बाहेर पडले आहे. आपण अपक्ष उमेदवार आहे, आपण बंडखोरी केले हे अजुन त्यांच्या लक्षात आले. माझी निवडणूक एकतर्फी आहे.
विशाल पाटील भाजपची बी टीम : चंद्रहार पाटील
विशाल पाटील ना मातीतला ना राजकारणातील पैलवान आहे. विशाल पाटील जर स्वतःला पैलवान म्हणून घेत असतील तर आम्ही पैलवानांनी आणि कुस्ती क्षेत्राने काय करावे? मविआमध्ये बंडखोरी केल्यामुळे काँग्रेस विशाल पाटलांवर कारवाई करणार आहे. सत्ता असताना संजय पाटलांनी आणि विशाल पाटलांनी काय विकास केलाय हे सर्वांना माहीत आहे.या दोघांची कामगिरी पाहता ही निवडणूक एकतर्फी आहे असे मी मानतो.
लिफाफ्याच्या माध्यमातून जनता आहेर देणार : विशाल पाटील
काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी आपला प्रचार सुरू केलाय आणि प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी भाजपाचे विद्यमान खासदार संजयकाका पाटलांच्यावर तोफ डागली आहे. दुसऱ्यांच्या कामाचा नारळ फोडण्याचा काम संजयकाका पाटलांनी केल्याचा आरोप विशाल पाटलांनी केलाय. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून आपल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही,कारण आपण काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केलेलं नाही. किंबहुना काय करायचं,काय करू नये याचे देखील आदेश पक्षाकडून आले नाही,त्यामुळे आपल्यावर कारवाईचा प्रश्नच नाही,असं देखील ठाम विश्वास विशाल पाटलांनी व्यक्त केले आहे. त्याच बरोबर आपला चिन्ह लिफाफा असून लिफाफ्याच्या माध्यमातून जनता आपल्याला मतांचा आहेर नक्कीच देईल असा देखील विश्वास विशाल पाटलांनी यावेळी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :