Sandipanrao Bhumre: मनोज जरांगे अन् संदिपान भुमरे यांची भेट; अर्धा तास कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा, भुमरे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कानावर....'
Sandipanrao Bhumre met Manoj Jarange Patil: आज शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
जालना - आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी त्यांनी सरकारला पुन्हा एकदा अल्टीमेटम दिलं आहे, परवापासून (मंगळवारी) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी आज शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. अंतरवाली सराटीमध्ये संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, मनोज जरांगे या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली.
या भेटीबाबत बोलताना संदिपान भुमरे यांनी सांगितलं की, मनोज जरांगे यांची आपण नेहमीच भेट घेतो, गॅझेट बाबतीत शंभूराज देसाई यांनी लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केलं असून, मुख्यमंत्री संभाजीनगर दौऱ्यावर असून आपण त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचं भुमरे यांनी सांगितलं आहे,तर आमच्या मागण्याबाबत सरकार कडून दगाफटका होणारं नसल्याचं भुमरे यांनी सांगितल्याचं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलं आहे, सग्या-सोयऱ्यांबाबत सरकारचं थोडंसं काम बाकी असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं असल्याचं देखील मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.
संदिपान भुमरे काय म्हणाले?
मनोज जरांगे यांची आपण नेहमीच भेट घेतो, गॅझेट बाबतीत शंभूराज देसाई यांनी लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केलं असून, परवा मुख्यमंत्री संभाजीनगर दौऱ्यावर असून आपण त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे,आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर सर्व काही घालणार आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीच्या आधी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दौऱ्यावर असून आपण त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचं भुमरे यांनी सांगितलं आहे. तर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्याशी आपण वेळोवेळी चर्चा करतो, त्यांची भेट घेतो असंही त्यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या भेटीसाठी संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत पोहचले आहेत. परवापासून जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यापूर्वीच भुमरे यांनी त्यांची भेट घेतली आहे. संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दोघांमध्ये अंतरवाली सराटी मध्ये सरपंचाच्या घरी चर्चा सुरू आहे. तर संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंना भेटण्यासाठी गेल्या असल्याने उपोषणापूर्वी शेवटचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनादिवशी जरांगे उपोषणाला बसणार
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे येत्या 17 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता मनोज जरांगे हे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंतरवाली सराटीतील यापूर्वीच्या आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती.