Sambhaji Bhide: मराठ्यांनी देश चालवायचा, आरक्षण का मागावं? संभाजी भिडे यांचा सवाल
मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे. हे ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल, असे संभाजी भिडे म्हणाले.
सांगली : बांगलादेशमध्ये हिंदू वर होणाऱ्या अत्याचाराविरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा अशी प्रतिक्रियाही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी दिलीय. तसंच मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केलाय. तसंच मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठून काढलंय, असंही भिडे म्हणालेत. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.
मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, पण मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठले काढले. मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे. हे ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. मात्र हे मराठ्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे, असे संभाजी भिडे म्हणाले.
कोणत्याही स्त्रीवरचा बलात्कार म्हणजे मातेवर बलात्कार : संभाजी भिडे
रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याबबाबत संभाजी भिडे म्हणाले, मुख्यमंत्री यांची जी भूमिका आहे तीच आमची आमची भूमिका आहे. उद्धव ठाकरे आज काही गोष्टीवर बोलत नाहीत. देशात बलात्कार प्रकार हा किळसवाणा झालाय, हा अत्याचार थांबायला हवेत. कोणत्याही स्त्रीवरचा बलात्कार म्हणजे मातेवर बलात्कार आहे, असे संभाजी भिडे म्हणाले.
बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा : संभाजी भिडे
पाकिस्तानचा अविभाज्य भाग म्हणून बांगलादेशचा जन्म झाला. त्या बांगलादेशच्या पंतप्रधान आज हिंदूस्थानकडे आश्रयाला आल्या, दुसरीकडे कुठे गेल्या नाहीत. पंतप्रधान भारतात आल्यावर बांगलादेश मध्ये प्रतिक्रिया उमटल्या . हिंदूंवर अत्याचार होतोय, बांगलादेशमध्ये सुरू असलेला अत्याचार तात्काळ थांबला पाहिजे. हिंदूस्थानमध्ये याची संतप्त प्रतिक्रिया उमटत नाही. बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा. बांगलादेशमधील हिंदू लोकांचे अजिबात स्थलांतरन नको ,त्याना बांगलादेश मधेच सुरक्षा मिळायली हवी. सगळ्या हिंदू राजकारण लोकांनी या गोष्टी घडल्यावर पेठून उठायला हवे, असे संभाजी भिडे म्हणाले.
हे ही वाचा :