Rupali Chakankar ठाणे: विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने लाडक्या बहिणांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, अद्यापही लाडक्या बहिणांनी 2100 रुपये मिळाले नाहीत. 1500 रुपयेच महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातून लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Scheme) 2100 रुपये मिळण्याची घोषणा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटनुसार लाडक्या बहिणींना कुठलीही वाढ मिळणार नाही. याउलट गतवर्षीच्या तुलनेत यंदा लाडकी बहिण योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीमध्ये कपात झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, याच मुद्याला घेऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आपली प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे. नुकताच अर्थमंत्री अजित दादा यांनी अर्थसंकल्प जाहीर केलाय. त्यात सार्वजनिक निधी महिला बाल विकास विभागाला दिलाय. या विभागाला निधी देणं म्हणजेच हा निधी महिलांना दिला. महाराष्ट्र राज्याच्या महिलांचा वतीनं दादांना खूप खूप आभार देते. मातृशक्तीला सन्मान करणार हा निधी आहे. असे म्हणत एकप्रकारे लाडकी बहीण योजनेवरुन रूपाली चाकणकरांनी सावरासावर केल्याची चर्चा आहे.
365 दिवस महिलांच्या सन्मान झाला पाहिजे- रूपाली चाकणकर
राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सगळेच अधिकारी एका पॅनलमध्ये एकत्र दिसतात. महिलांच्या बाबतीत समस्या आणि प्रश्न देखील सोडवण्यात येतात. तीन वर्षाचा कालावधीमध्ये 35 ते 40 हजार केसेस सोडवल्या. महिलांच्या सुरक्षेसाठी टोल फ्री देखील महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे. तो 112 हा टोल फ्री नंबर आहे. महायुतीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. 365 दिवस महिलांच्या सन्मान झाला पाहिजे. बचत गटाच्या महिलांना देखील आता मॉलमध्ये वस्तू विक्री करण्यासाठी स्थान मिळणार आहे. आपल्या लाडक्या बहिणी या दोन भावाच्या मागे ठामपणे उभ्या आहेत, असे विश्वास हात वरकरून व्यक्त करूया.असेही
महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत- रूपाली चाकणकर
महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यांनी ठामपणे आपलं म्हणणं मांडावं त्यांना आम्ही विश्वास देऊ. समाजातील विकृती ठेचून काढायची आहे.माझं प्रत्येक तालुक्यामध्ये विभागीय कार्यालय आहे. मुंबईमध्ये देखील आहे. प्रत्येक महिलेला व्यासपीठ दिलेला आहे. त्यांनी आपल्या तक्रारी मांडायला हव्यात. मी प्रत्येक जिल्ह्यात जन सुनावणी घेत आहे. ज्या महिला माझ्यापर्यंत पोहोचत नाही, मी यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे. असेही रूपाली चाकणकर म्हणाल्या.
हे ही वाचा