Ladki Bahin Scheme : लाडकी बहिण योजनेच्या (Ladki Bahin Scheme) माध्यमातून सरकार प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 रुपयांची मदत करते. राज्यातील मोठ्या प्रमाणात महिलांना या योजनाचा लाभ मिळतो. मात्र, आता या योजनेबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बजेट डोळ्यासमोर ठेऊन योजना राबवाव्या लागतात. लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरु करता येतील असंही रामदास कदम म्हणाले. त्यामुळं आता लाडकी बहिण योजना बंद होणार का? अशी देखील चर्चा सुरु आहे. 


नेमकं काय म्हणाले रामदास कदम?


अंथरुण पाहून पाय पसरावे लागतात. बजेट डोळ्यासमोर ठेऊन योजना राबवाव्या लागतात. लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरु करता येतील असंही रामदास कदम म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण सत्ताधारी महायुतीच्या नेत्यानेच असं वक्तव्य केल्यानं अनेकांच्या मनात लोडकी बहिण योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 


माजी आमदार संजय कदम यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर काय म्हणाले रामदास कदम?


माजी आमदार संजय कदम  (Former MLA Sanjay Kadam) यांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर रामदास कदम यांची प्रतिक्रिया दिली आहे. संजय कदम यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय अद्याप झालेला नाही. ते पक्षात येणार असतील तर मी पायघड्या घालेन असेही रामदास कदम म्हणाले. कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत संजय कदम यांची पक्षांतराची भूमिका ठरल्याची माहिती मिळत आहे. 


विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने लाडक्या बहिणांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, अद्यापही लाडक्या बहिणांनी 2100 रुपये मिळाले नाहीत. 1500 रुपयेच महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातून लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये मिळण्याची घोषणा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटनुसार लाडक्या बहि‍णींना कुठलीही वाढ मिळणार नाही. याउलट गतवर्षीच्या तुलनेत यंदा लाडकी बहिण योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीमध्ये कपात झाल्याचं पाहायला मिळत आहे.



महत्वाच्या बातम्या:


Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित