महायुतीचं तिकीट मिळालं, पण कोणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? रासपच्या महादेव जानकरांनी दिलं उत्तर!
कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, याबाबत महादेव जानकर यांनी उत्तर दिलं आहे.
मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना महायुती (Mahayuti) एक जागा देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जानकर हे महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) लोकसभेची (Lok Sbha) निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात होते. महायुतीने त्यांना एक जागा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान, महादेव जानकर यांना एक जागा देण्याचे ठरले असले तरी ही जागा कोणती असेल? ते कोणत्या जागेवरून निवडणूक लढवतील? याबाबत अस्पष्टता होती. मात्र आता खुद्द जानकर यांनीच यावर भाष्य केलंय. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
शरद पवार देणार होते तिकीट?
महादेव जानकर यांना महाविकास आघाडीकूडन जागा दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. शरद पवार हे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेल्या जागेवरून जानकर यांना माढ्यातून तिकीट देऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात होता. विशेष म्हणजे खुद्द शरद पवार यांनीदेखील तशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. बारामती, माढा, सातारा या भागातील ओबीसी मतांचे प्रमाण लक्षात घेऊन पवार हा निर्णय घेणार होते. मात्र महायुतीने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत जानकर यांना एक जागा देण्याचा निर्णय घेतला.
जानकर कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार
महायुतीने जानकर यांना तिकीट दिले असले तरी ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच जानकर हे त्यांच्या रासप या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार का? याबाततही विचारले जात होते. दरम्यान, माध्यम प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत त्यांनी याबाबत उत्तरं दिलं आहे. मी राष्ट्रीय समाज पक्षावरच आमदार झालेलो आहे. भविष्यात मी जो खासदार होणार आहे तोदेखील राष्ट्रीय समाज पक्षाच्याच चिन्हावर होणार आहे, असे जानकर यांनी स्पष्ट केले.
माढ्यातून पवार कोणाला संधी देणार?
दरम्यान, महायुती जानकर यांना परभणी या मतदारसंघातून तिकीट देण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जानकर महायुतीसोबत गेल्यामुळे आत माढ्यासाठी अन्य उमेदवाराचा विचार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून केला जातोय. त्यामुळे या जागेवर पवार नेमकं कोणाला संधी देणार? याची उत्सूकता सर्वांनाच लागली आहे.
हेही वाचा >>
महादेव जानकरांना महायुतीचे तिकीट, आता मविआकडून नेमकं कोण? 'या' नव्या नावाची चर्चा!
Raju Parwe : महायुतीचं ठरलं, रामटेकमधून राजू पारवेच उमेदवार, 'या' तारखेला उमेदवारी अर्ज भरणार!