एक्स्प्लोर

Rohit Pawar on Ajit Pawar : 'पूर्वी धडाडीचे दादा म्हणून माहीत होते, भाजपसोबत गेल्यापासून...'; रोहित पवारांची काका अजित पवारांवर बोचरी टीका

Rohit Pawar on Ajit Pawar : महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीला जाताना मी मास्क आणि टोपी घालून जायचो, असा खुलासा अजित पवारांनी केला होता.

Rohit Pawar on Ajit Pawar : महायुतीमध्ये (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी होण्यापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्लीमध्ये (Delhi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत कशा बैठका केल्या, याबाबत भाष्य केले. मास्क आणि टोपी घालून दिल्ली दौरा करत होतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. यावरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. 

दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी मी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये 10 बैठका झाल्या होत्या. या बैठकीला जाण्यासाठी मी खास पेहराव करून दिल्लीला जायचो. मास्क आणि टोपी घालून मी या बैठकीला उपस्थिती लावायचो, असे वक्तव्य त्यांनी केले. अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

स्वाभिमानी जनतेने त्यांच्या पार्टीला टोपी घातली

यावरून रोहित पवार म्हणाले की, अजित पवार हे धडाडीचे दादा म्हणून आम्हाला माहीत होते. आत्ताचे भाजपसोबत गेलेले अजित दादा यांना सर्व गोष्टी विचाराव्या लागतात. एखादी सही केल्यानंतर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याकडे त्यांची फाईल जाते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे फाईल जाते. दादांनी टोपी तुम्ही घातली असावी. पण, आपण लोकसभेमध्ये बघितलं तर स्वाभिमानी जनतेने त्यांच्या पार्टीला टोपी घातली आहे, असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला आहे. 

बारामतीत लढत होईल, असा उमेदवार देणार

बारामतीत विधानसभा निवडणुकीसाठी कुठला उमेदवार देणार अशी विचारणा केली असता रोहित पवार म्हणाले की, बारामतीत योग्य असा उमेदवार देऊ, राजनीतीचा तो भाग आहे. पुढील वीस दिवसात समजेल की तिथे उमेदवार कोण असेल, उमेदवार जो कोणी असेल, योग्य उमेदवार तिथे दिला होता. तिथे खूप चांगली लढत आमच्याकडून होईल, असे त्यांनी म्हटले. 

रोहित पवारांचा मिसळीवर ताव 

रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मिसळचा आस्वाद घेतला. यावेळी ते म्हणाले की, मिसळ ही आपल्या महाराष्ट्राचे डिश आहे. सामान्य लोकांचे प्रतीक आहे. जेव्हा पण मी एखाद्या बैठकीला जातो, त्यावेळेस कार्यकर्त्यांसोबत प्रसिद्ध हॉटेलवर जाऊन मला खायला आवडतं. रामकृष्ण हरी, मिसळ आमची भारी असं म्हणण्याची वेळ आज आहे, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

अजितदादांना धक्के सुरुच, आणखी एका दिग्गज नेत्याने साथ सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayashree Thorat : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
Jayshree Thorat: जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य म्हणाल्या, 'आचारसंहिता भंग...'
जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य म्हणाल्या, 'आचारसंहिता भंग...'
Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटलांच्या मशालीला ए वाय पाटलांच्या बंडखोरीची 'धग' सहन करावी लागणार! विधानसभेसाठी दंड थोपटले, अपक्ष अर्ज भरणार
केपी पाटलांच्या मशालीला ए वाय पाटलांच्या बंडखोरीची 'धग' सहन करावी लागणार! विधानसभेसाठी दंड थोपटले, अपक्ष अर्ज भरणार
Gopichand Padalkar : उमेदवारी मिळताच भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जत तालुक्यातील दोन दुश्मन सांगितले!
उमेदवारी मिळताच भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जत तालुक्यातील दोन दुश्मन सांगितले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gulabrao Patil Jalgaon : बाप्पाचं दर्शन घेत गुलाबराव पाटलांनी केली प्रचाराला सुरूवातABP Majha Headlines :  1 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM :   27 ऑक्टोबर  2024: ABP MajhaJayashree Thorat : खोटे गुन्हे दाखल करून खालच्या पातळीचं राजकारण सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayashree Thorat : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
Jayshree Thorat: जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य म्हणाल्या, 'आचारसंहिता भंग...'
जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य म्हणाल्या, 'आचारसंहिता भंग...'
Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटलांच्या मशालीला ए वाय पाटलांच्या बंडखोरीची 'धग' सहन करावी लागणार! विधानसभेसाठी दंड थोपटले, अपक्ष अर्ज भरणार
केपी पाटलांच्या मशालीला ए वाय पाटलांच्या बंडखोरीची 'धग' सहन करावी लागणार! विधानसभेसाठी दंड थोपटले, अपक्ष अर्ज भरणार
Gopichand Padalkar : उमेदवारी मिळताच भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जत तालुक्यातील दोन दुश्मन सांगितले!
उमेदवारी मिळताच भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जत तालुक्यातील दोन दुश्मन सांगितले!
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : भाजपच्या रावसाहेब दानवेंची लेक शिंदे गटात प्रवेश करणार, कन्नड विधानसभेतून तिकीट फिक्स?
मोठी बातमी : भाजपच्या रावसाहेब दानवेंची लेक शिंदे गटात प्रवेश करणार, कन्नड विधानसभेतून तिकीट फिक्स?
Bandra Terminus Stampede: रात्री पावणेतीन वाजता वांद्रे टर्मिनसवर भयावह किंकाळ्यांचा आवाज , प्रत्यक्षदर्शीने सांगितला आँखो देखा थरार
रात्री पावणेतीन वाजता वांद्रे टर्मिनसवर भयावह किंकाळ्यांचा आवाज , प्रत्यक्षदर्शीने सांगितला आँखो देखा थरार
Pandharpur Vidhan Sabha : चंद्रशेखर बावनकुळे थेट विमानाने भेटीसाठी पोहोचले, बंद खोलीत चर्चा, तरीही प्रशांत परिचारकांच्या चेहऱ्यावर नाराजी कायम!
चंद्रशेखर बावनकुळे थेट विमानाने भेटीसाठी पोहोचले, बंद खोलीत चर्चा, तरीही प्रशांत परिचारकांच्या चेहऱ्यावर नाराजी कायम!
मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर बेड्या
मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर बेड्या
Embed widget