Sunil Shelke : रोहित पवारांचा राष्ट्रवादी पक्षातील नेते भाजपात जाण्याचा दावा; आता सुनील शेळकेंनी जुना किस्सा सांगत सगळंच काढलं, म्हणाले 'भाजपमध्ये कोण जाण्याचा....'
Sunil Shelke on Rohit Pawar : मी 2019 साली भाजप सोडून, अजित पवारांनी मला राष्ट्रवादीची वाट दाखवली. त्यामुळं माझं आणि माझ्या तालुक्याचं भलं झालं असंही शेळकेंनी म्हटलं आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्याक्ष सुनील तटकरे व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे 22 हून अधिक आमदार भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यावर प्रतिक्रिया देखील दिली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार सुनील शेळकेंनी (Sunil Shelke) रोहित पवारांवर पलटवार केला आहे.(Sunil Shelke on Rohit Pawar)
सुनील शेळकेंनी (Sunil Shelke) रोहित पवारांना उत्तर देताना म्हटलं की, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनी आहेत, आमचे सर्व नेते पदाधिकारी हे सुनेत्रा वहिनी यांच्या पाठीशी आहेत. हे जे काही गटतट बोललं जातं आहे, त्याला कुणीही दुजोरा देऊ नका, सुनेत्रा वहिनी पक्षाची आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून काम करत आहेत, आपण त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. विरोधी मंडळींनी जाणीवपूर्वक त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये. तर रोहित दादा पवार आता हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले पाहिजेत अशी मागणी मी आता आमच्या पक्षाच्या नेत्यांकडे करणार आहे. जे सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची भविष्यवाणी करतात, कोणाला पदे द्यायची कोणाची काढायची हे देखील सांगतात अशी स्टेटमेंट त्यांनी थांबवावीत, असंही शेळकेंनी म्हटलं आहे. (Sunil Shelke)
Sunil Shelke on Rohit Pawar : भाजप प्रवेशावर सुनील शेळके म्हणाले....
मी 2019 साली भाजप सोडून, अजित पवारांनी मला राष्ट्रवादीची वाट दाखवली. त्यामुळं माझं आणि माझ्या तालुक्याचं भलं झालं. त्यामुळे 2019 ला भाजपमधून मी राष्ट्रवादीत आलो, तेव्हा जे रोहित पवार राष्ट्रवादीत होते, त्यावेळी ते भाजपमध्ये निघाले होते. त्यानंतर 2022 ला महाविकास आघाडीचे सरकार गेले, त्यावेळी आम्ही शिंदे साहेबांनी वेगळी भूमिका घेतली, आम्ही अजित पवारांना म्हटलं आपण सत्तेत सहभागी झालं पाहिजे, त्याच वेळी अजित पवार तुम्ही याविषयी पवार साहेबांशी बोला असं म्हणाले. याबाबत आम्ही पवार साहेबांकडे गेलो त्यावेळी एक नंबर लीडिंगला रोहित पवार होते आणि दोन नंबर लीडिंगला सुनील शेळके त्यामुळं भाजपमध्ये कोण कोण जाण्याचा प्रयत्न करत होते, किती वेळा करत होते, हे मला वेगळं सांगायला नको असं म्हणत शेळकेंनी रोहित पवारांना डिवचलं आहे.
Sunil Shelke on Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षात दुफळी पडल्याच्या चर्चेवर शेळके म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे, एक संघ आहे, एका विचाराने आहे. जाणीवपूर्वक जे कोणी असे करत आहेत, त्यांनी पुरावे द्यावे. त्यांनी सांगाव पक्षात कोणावर अन्याय होत आहे. सुनेत्रा वहिनी घरातल्या व्यक्तींना टार्गेट केलं जात आहे. रोहित पवार अजित पवारांच्या प्रति जे प्रेम दाखवतात, पण ते हयातीत असतांना काय काय बोलत होते ? आता अजित दादा विमान अपघात तपासा बाबत आम्हाला ही ते काही बोलत नाही आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना ही ते काही बोलत नाही. अपघात तपासाबाबत आम्ही आमच्या पद्धतीने पाठपुरावा करत आहे, रोहित पवार सुनेत्रा पवारांना, पार्थ पवारांना, जय पवारांना टार्गेट करत आहेत. रोहित पवार यांना आता कर्जत जामखेड सोडून बारामती मधून लढायचे आहे, ते पण काँग्रेसमधून लढायचे आहे. ते त्यांच्या मतदार संघात फिरकत नाहीत. म्हणून ते आतापासूनच रणनीती आखत आहेत हे स्पष्ट आहे, असंही पुढे शेळकेंनी म्हटलं आहे.
Before You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?






















