(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Patil : विधानसभेचा पहिला निकाल तासगाव कवठे-महंकाळचा असेल, रोहित पाटलांनी शड्डू ठोकला
Rohit Patil, Sangli : "देशात लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपल्या पक्षाचा आहे. हे शेवटचं अभिनंदन करत असताना मी आपल्याला शब्द देतो की, विधानसभेचा पहिला निकाल तासगाव कवठे-महंकाळचा असेल"
Rohit Patil, Sangli : "देशात लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपल्या पक्षाचा आहे. हे शेवटचं अभिनंदन करत असताना मी आपल्याला शब्द देतो की, विधानसभेचा पहिला निकाल तासगाव कवठे-महंकाळचा असेल", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत कवठे महांकाळ, सांगली येथे शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
रोहित पाटील म्हणाले, कवठे महंकाळ मतदारसंघातील लोकांनी मला बोट धरुन चालायला शिकवलेलं आहे. आबांना तालुक्यात एमआयडीसी आणायची होती. मात्र, काही समाजकंठकांनी आबांना क्रेडिट मिळेल म्हणून विरोध केला. आबांचे ते काम पूर्ण होऊ दिलं नाही. आपण राज्यस्तरावर पाठपुरवठा करुन एमआयडीसी मंजूर केली.
आबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करतोय
पुढे बोलताना रोहित पाटील म्हणाले, साहेब (शरद पवार) कवठे महंकाळ तालुका म्हणून संबोधला जायचा. पण मला कवठे महंकाळ तालुका लागलाय, असं जेव्हा मी शरद पवारांना सांगितलं. तेव्हा पवार साहेब म्हणाले, रोहित अलीकडे, पलिकडे सगळीकडे ऊस दिसायला लागलाय. आर आर आबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करतोय. या शहराचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. वडिलांना स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, मी ते स्वप्न पूर्ण करुन दाखवणार आहे, असा विश्वासही रोहित पाटील यांनी व्यक्त केला.
इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, ते द्राक्षवेलीच्या मुळापर्यंत गेला पाहिजे
पुढे बोलताना रोहित पाटील म्हणाले, वसंतदादा म्हणायचे सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळ होता. इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. तो द्राक्षवेलीच्या मुळापर्यंत गेला पाहिजे. त्यातून द्राक्षशेती फुलली पाहिजे. आज या सगळ्या विचारांचा वारसदार जर कोण असेल तर ते शरद पवार आहेत. पवार साहेबांकडे पाहिल्यानंतर आम्हा तरुणांना ऊर्जा मिळते. 1960 साली त्यांनी राजकारणात पदार्पण केलं. अनेक संकटांना सामोर गेले.
आपल्या सर्वांना आठवत असेल पवार साहेबांनी कर्जमाफी केली. आजपर्यंत जो निर्णय कधी झाला नाही, अशी 70 हजार कोटींची कर्जमाफी त्यांनी केली. साहेबांनी अनेक निर्णय घेतले. सहकारी संस्था बळकटी केल्या. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणलं. देशातील शेतकऱ्यांसाठी आजवर एवढे चांगले निर्णय घेणारा कृषीमंत्री झाला नाही, असंही रोहित पाटील यांनी नमूद केलं.
इतर महत्वाच्या बातम्या