एक्स्प्लोर

Ratnagiri News : नाराजीच्या चर्चांमध्ये भास्कर जाधवांचा जाहीरपणे ठाकरेंना शब्द; म्हणाले...

Ratnagiri News : राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले भास्कर जाधव ठाकरेंच्या सभेला उपस्थिती लावणार की नाही? याकडे सर्वांचं विशेष लक्ष होतं. पण भास्कर जाधव ठाकरेंच्या सभेसाठी उपस्थित होते.

Bhaskar Jadhav: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज रत्नागिरीच्या (Ratnagiri News) दापोली (Dapoli) आणि गुहाघर (Guhagar) येथे जनसंवाद दौऱ्यावर आहेत. दापोली शहरातील आझाद मैदान येथे जाहीर सभा पार पडली. तर गुहागरात शृंगारतळी येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. महत्त्वाचं म्हणजे, राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) ठाकरेंच्या सभेला उपस्थिती लावणार की नाही? याकडे सर्वांचं विशेष लक्ष होतं. पण भास्कर जाधव ठाकरेंच्या सभेसाठी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांचं हेलिपॅडवर आगमन होताच, भास्कर जाधव आणि शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात आलं. 

जाहीर सभेत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, "भाजपच्या नेत्यांनी (निलेश राणे) यांनी वापरली भाषा चुकीची, मनात वेदना पण त्याबद्दल मी आता बोलणार नाही, जिल्ह्यात महिलांचे मेळाव्या घेऊन (निलेश राणे) त्यांचं भाषण दाखवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे तुम्ही  परवानगी देणार नाहीत हे माहिती आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, विनायक राऊत आणि अनंत गिते यांना दिल्लीत पाठवेन, असं म्हणत भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिला. 

भास्कर जाधवांच्या नाराजीच्या चर्चा का? 

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण मतदारसंघातील आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र (Emotional Letter) लिहलेलं. या पत्रात त्यांनी आपल्या  सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त केलं होते. त्यानंतर भास्कर जाधवांनी चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपलं मन मोकळं केलं. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवर भास्कर जाधवांनी प्रकाश टाकला. मागील काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडल्या, त्यामध्ये कार्यकर्त्यांना आपली भूमिका भास्कर जाधवांनी पटवून देऊन मनमोकळं केलं. 

"आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना यत्किंचितही न घाबरता उद्धवसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होतच आहेत. आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरुन जाहीरपणे केली जात असल्याचे जाधव म्हणाले. अशातच 40 वर्षांपासूनचे माझे जुने-जाणते वयोवृध्द तसेच नवीन व ताज्या दमाचे सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे पाहिल्यावर माझा उर भरून येतो व आजही आपण अन्यायाच्या, गुंडगिरीच्या आणि विश्वासघाताच्या विरोधात लढलं पाहिजे, ही उर्जा मिळते.", असं भास्कर जाधव म्हणाले. 

"मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे. पण, या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय ? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे. सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर मग रविवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल, चिपळूण येथे एकत्र येऊया. आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया.  मी आपली वाट पाहतोय..!!", असं या पत्रात भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांपू्वी दापोलीत सभा घेतली त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्यानं सभा विशेष चर्चेत होती. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav), खासदार विनायक राऊत, खासदार अनंत गीते, माजी आमदार संजय कदम हे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget