Ramraje Naik Nimbalkar, सातारा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे तुतारी हाती घेणार अशी चर्चा होती. मात्र, रामराजे निंबाळकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, फलटणमध्ये आज (दि.10 आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांबाबतच्या तक्रारींचा पाढाच वाचलाय. शिवाय अजित पवार आणि महायुतीकडे तक्रार करणार असल्याचेही निंबाळकर यांनी सांगितले. 


रामराजे निंबाळकर काय काय म्हणाले? 


रामराजे निंबाळकर म्हणाले, मी कुठं जातोय याला किंमत राहिली नाही. आम्हाला न्याय मिळत नसेल आणि कार्यकर्ता घरी बसणार असेल, कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न होणार असेल तर आम्ही उत्तर काय द्यायची? कुठल्याही पक्षात गेलो तरी काय उपयोग होणार आहे. सातारा जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाला अमित शहा येतो असं म्हणाले होते. कुठून मान आणि दहिवडीमधून फोन गेले राज्य आणि देश पातळीवरील नेतृत्व त्यांना साथ देणार असेल तर आम्ही करायचं काय? असा प्रश्न आम्ही अजित पवारांना विचारणार आहे. तुम्ही अजितदादांना सोडून जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या विरोधकांनी केलं आहे का? हे पाहावे लागेल. कारण त्यांना असले करण्याची घाण सवय आहे. कारण रामराजे गेले तर भाजपच्या चिन्हावर त्यांना ही जागा लढायला मिळेल असा उद्देश असेल.


ज्या उद्देशाने पक्षात आपण गेलो होतो तो उद्देश साध्य झाला नाही


दीपक चव्हाण म्हणाले,  विरोधी पक्षाकडून जो त्रास झाला म्हणून महाराज साहेबांनी एका वर्षापूर्वी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला पण ज्या उद्देशाने पक्षात आपण गेलो होतो तो उद्देश साध्य झाला नाही. त्यामुळे देशामध्ये अनेक लोक आहेत. परंतु देशामधील इतर लोक सोडून इथे इडी येत असेल तरी ईडीचे काम संपले. युतीत जाताना ज्या गोष्टींवर निर्णय झाला होता. ज्या गोष्टी ठरले होते तसं काही झालं नाही. जो आमदार असेल त्याच्या सांगण्यावरूनच बदल्या होणार असं सांगितलं होतं. परंतु कोणत्याही बदल्या आमच्या पत्रावर झाल्या नाहीत. फलटणचं पाणी फलटणमध्येच रहायला पाहिजे. माजी खासदार ते पाणी सांगोल्याला नेण्याचा प्रयत्न करतात ते काम आपण हाणून पाडू


 दोन अडीच वर्षात जो त्रास झालाय त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना 


संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, कार्यकर्ते बोलतात त्याच्या मागे काहीतरी भावना आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करायला जमणार नाही हे सांगितले. मागच्या दोन अडीच वर्षात जो त्रास झालाय त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना अशा आहेत. रामराजे यांना विनंती करतो कार्यकर्त्यांच्या भावना जाणून आपल्याला विचार लागेल. विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना मेळाव्यातून एक ते दोन दिवसात जाणून घ्याव्या लागतील. लाडकी बहिण योजना किती दिवस चालेल मला माहित नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


शरद पवारांबाबत केलेली वक्तव्ये माझ्या मनाला लागली, विधानसभेपूर्वी सख्ख्या भावाचा अजित पवारांना पहिला रोखठोक इशारा