Ramraje Naik Nimbalkar, सातारा : " शेवटी काय करायचं आणि काय नाही, हे आपल्या हातात राहिलेलं नाही. ते भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाचं त्यांचे कार्यकर्ते सांभाळण्याचं काम आहे. प्रशासनाला सांभाळण्याचं काम आहे. त्यामध्ये सुधारणा झाली तर ठीक आहे. आता प्रश्न तुम्ही जो उभा केला. त्याबाबत तुम्ही तीन महिन्यापूर्वी तुतारी सांगितली. आपली भारतीय जनता पार्टीबरोबर भांडणं नाहीत. आपण हिंदूत्व-मुसलमान करत नाहीत. आपली तक्रार फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. या दहशतीला सपोर्ट करु नका, एवढीच आपली तक्रार आहे. तेवढ त्यांना सांगून बघू. फरक जर नाही पडला, तर आपल्याला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही", असा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी दिलाय. ते साताऱ्यात बोलत होते 






तक्रार रणजितसिंह निंबाळकरांबाबत तक्रार, वरिष्ठांच्या कानावर घालू, अन्यथा तुतारी वाजवू; रामराजे निंबाळकरांचा इशारा


अजित पवार उद्या फलटण येथे असून त्यांच्या स्वागताच्या आणि कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रामराजे यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये बैठक झाली. महायुतीचा असलेल्या उमेदवाराला मदत केली नाही आणि जर भाजपचे नेते सहकार्य करत नसतील तर पक्ष श्रेष्ठींच्या कानावर घालू, नाहीतर तुतारी वाजवू असे वक्तव्य केले आहे अजित पवार गटाचे रामराजे यांनी. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या रामराजे हे तुतारी हातात घेतील आसे चित्र दिसू लागले आहे. काय म्हणाले रामराजे आपण पाहूयात.


रामराजे निंबाळकरांनी घेतला होता अजितदादांसोबत राहण्याचा निर्णय 


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांसोबत फारकत घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रामराजे निंबाळकर हे अजित पवारांसोबत होते. मात्र, आता स्थानिक पातळीवरील वादामुळे त्यांनी तुतारीसोबत जाण्याचा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीतही रामराजे निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केल्याची चर्चा होती. दरम्यान, आता अजित पवारांना रामराजेंना थांबण्यात यश आलं नाही, तर हा मोठा धक्का बसू शकतो. 


इतर महत्वाच्या बातम्या


Sharad Pawar : चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहित करता, अंगाशी आलं की माफी मागता, शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना होऊ शकते का? शरद पवारांना पीएम मोदींना सवाल