Ramdas Athawale Sindhudurg : पूर्वीचं राजकारण नीतिमत्तेवर आधारीत होतं,  परंतु आता जे मी पाहतोय आरोप प्रत्यारोप ते अती होतंय. पतंप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) काम पाहून विरोधकांचा जळफळाट होतोय. मोदींनी काहीं केलं तरी विरोधक जळफळाट करतात. आमच्या सरकारला बहुमत आहे,  त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालणार आहे. लोकसभेला जागा आमच्या कमी निवडून आल्या तरी विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील. असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

  


विरोधकांना घेऊन पुतळा उभारण्यासंदर्भात एक समिती बनवावी. या संदर्भात मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलेन. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला सोडून बॅक टु पॅव्हेलियन यावं. त्यासाठी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना योग्य मार्गदर्शन करावं, असे आवाहनही मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. राज्यात सुरू असलेले जोडे मारो आंदोलन हा प्रसिद्धीचा स्टंट आहे. आम्ही ही कोणालापण जोडे मारू शकतो. अस आंदोलन करणे योग्य नाही, वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायला हरकत नव्हती. जोडे मारों आंदोलन त्यांनी मागे घ्यावे,  अशी माझी महाविकास आघाडीला विनंती असल्याचेही रामदास आठवले म्हणाले.


पुतळा बसविला, ऑर्डर कोणी दिली, याची चौकशी होणे गरजेचे 


छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यांनी लढून आपल्या दुष्मनांना त्यांनी चारी मुंड्या चीत केले होते. आठ महिन्यांपूर्वी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले. राज्यात आणि  देशात इतर माननीय व्यक्तींचे पुतळे आहेत. पुतळा बसविला, ऑर्डर कोणी दिली, याची चौकशी होणे गरजेचे आहे. नवख्या व्यक्तीला पुतळा बनवायला देणे गंभीर आहे. हा निर्णय अतिशय चुकीचा होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, यामध्ये राजकारण करायची गरज नाही. पंतप्रधान मोदींनी ही याबाबत माफी मागीतली आहे. यावर ही विरोधकांनी राजकारण केलं आहे.


राणेंचा आणि ठाकरेंचा गट यांच्यातला राडा हा काही पहिलाच राडा नव्हता


चक्रीवादळ नसताना पुतळा कसा पडला? योग्य पद्धतीने पुतळा बनवण्यात आला नव्हता. पुतळा मजबूत असला असता तर कोसळला नसता. पोलिसांनी लवकरात लवकर फरार आरोपीला पकडायला हवं. यात जे जे दोषी आहेत त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री यांनी म्हटल ते खर आहे, त्या दिवशी हवा मोठी होती. परंतु पुतळा मजबूत बनवला नव्हता. मंत्री नारायण राणेंचा आणि ठाकरेंचा गट यांच्यातला हा काही पहिलाच राडा नव्हता. त्यांचे राडे होत असतात. पोलिसांनी एका एकाला पाठवायला हवं होतं. 


हे ही वाचा