एक्स्प्लोर

बंगळुरु स्फोटात अटक केलेला आरोपी भाजपचा नेता, काँग्रेसच्या दाव्याने खळबळ

Rameshwaram Cafe Blast Case : राष्ट्रीय तपास यंत्रेणेकडून म्हणजेच 'एनआयए'कडून बंगळुरु बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे.

Rameshwaram Cafe Blast Case : राष्ट्रीय तपास यंत्रेणेकडून म्हणजेच 'एनआयए'कडून बंगळुरु बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन याबाबतचे दावे करण्यात आले आहेत. रामेश्वरम कॅफे (Rameshwaram Cafe Blast Case) स्फोटाचे हे प्रकरण असल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे. 

काँग्रेसने कोणते दावे केलेत ?

काँग्रेसने भाजप कार्यकर्त्याबाबत एक ट्वीट केलं आहे. "1 मार्च रोजी बंगळुरुच्या रामेश्वरम कॅफेमध्ये ब्लास्ट झाला होता. या ब्लास्टमध्ये 10 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयने भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. याचे कनेक्शन स्फोटाशी आहे. भाजपचे दहशतीशी कनेक्शन का असतात?", असे दावे काँग्रेस पक्षाने ट्वीटरच्या माध्यमातून केले आहेत. 

राष्ट्रीय तपास यंत्रणेने काय म्हटलं?

दहशतवादी कृत्य असल्याने आम्ही साक्षीदारांची नावे किंवा त्यांची ओळख उघडपणे सांगणार नाहीत. कारण त्यांची ओखळ सांगितल्यास तपासात अडचणी येऊ शकतात. शिवाय, काही बातम्याही या प्रकरणावर प्रभाव पाडू शकतात. त्यामुळेही तपासात अडचणी येतील. त्यामुळे फरार आरोपीच्या अटकेबाबत सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

आरोपी मुसावीर शाजिब हुसेन याची ओळख पटली

एनआयएने नुकतेच रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक केली होती. एनआयएच्या पथकांनी कर्नाटकातील 12, तामिळनाडूतील 5 आणि उत्तर प्रदेशातील एका ठिकाणासह एकूण 18 ठिकाणी कारवाई केली. यावेळी मुजम्मिल शरीफ याला ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी हा स्फोट घडवणारा मुख्य आरोपी मुसावीर शाजिब हुसेन याची ओळख पटलीये. तपास यंत्रणेने या प्रकरणातील आणखी एक सूत्रधार अब्दुल मतीन ताहा ओळखला होता, जो इतर प्रकरणांमध्येही एजन्सीला हवा आहे. दोन्ही व्यक्ती सध्या फरार आहेत.

स्फोटानंतर कॅफेतील सुरक्षा वाढवली

1 मार्च रोजी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात 9 जण जखमी झाले आहेत. आयईडी  टायमर वापरून कॅफेमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले होते. स्फोटानंतर महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात कॅफे पुन्हा सुरू करण्यात आले. शिवाय ग्राहकांची तपासणी करण्यासाठी कॅफेच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर लावण्यात आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Harshvardhan Patil: पोलिसांना वरुन कोणाचा तरी फोन येतो, तेवढा फोन बंद करा; फक्त तुमच्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतोय : हर्षवर्धन पाटील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dahisar Voting Controversy : केंद्रावर जाण्याआधीच झालं होतं मतदान,स्थानिकांचा मोठा दावाSaleel Kulkarni on Election : तक्रार नंतर करा आधी मतदान करा! सलील कुलकर्णींचं तरुणांना आवाहनJay Pawar Shrinivas Pawar: दादांचा लेक लाखात एक..!भर रस्त्यात जय पवारांचा श्रीनिवास पवारांना नमस्कारVotting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
Embed widget