मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल राम नाईक (Ram Naik) यांनी मी स्वत:साठी मतदानाला पहिला नंबर लागला पाहिजे, असा नियम केल्याचं म्हटलं. मतदानाचं विभाजन झाल्यानंतर रवींद्र वायकरांच्यासाठी (Ravindra Waikar) मतदान केलं काम केलं पियूष गोयल (Piyush Goyal) यांचं, असं नाईक म्हणाले. लोकशाहीचा जो निर्णय येईल तो मान्य केला पाहिजे. भारतात जितके लोक मतदान करतात तितके मतदार कुठेही नाहीत, असं राम नाईक म्हणाले.  मतदार निर्णय देतील आणि मुंबईमधून सर्वांना आनंद देणारा निर्णय होईल, सगळे निवडून येतील, असा विश्वास असल्याचं राम नाईक म्हणाले. 


राम नाईक यांनी मुंबईत मतदान वाढेल, असा अंदाज व्यक्त केलं आहे. यावेळी भरघोस मतदान होईल, असं नाईक यांनी म्हटलं.  मतदारांनी  4 जूनला जो निर्णय दिलाय तो माहिती होईल. मी पियूष गोयल यांच्यासाठी काम केलं आहे. मुंबईतून जास्त मतं पियूष गोयल यांना मिळतील अशी खात्री असल्याचं रामन नाईक म्हणाले. 


मतदानासाठी घरातून जे लोक निघालेले नाहीत, त्यांनी मतदानासाठी लवकर निघावं, असं राम नाईक म्हणाले. जो कुणी निवडून येईल तो आपला प्रतिनिधी म्हणून आपण वागायचं. निवडून आला असेल त्यानं ज्यांनी मतं दिली त्यांच्यासठी काम केलं पाहिजे, असं राम नाईक म्हणाले. 


वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर काय म्हणाले?


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी , बरेच लोक सोडून जाणं हे पहिल्यांदा पाहतोय, असं म्हटलं. मला असं वाटतं की माझे वडील तीन टर्म उमेदवार होते. त्यावेळी मी बॅक सपोर्ट देत होतो. यावेळी दोन्ही जबाबदाऱ्या मी पार पडत होतो. नक्कीच दमछाक झालीय पण  वडील सोबत नसले तरी त्यांच्या अनुभवाचे, मायेचे, मविआतील घटकपक्षाचे लोक माझ्या मागं उभं राहिले आहेत.  विजय आमचाच होणार आहे, असं अमोल कीर्तिकर म्हणाले. 


दरम्यान, मुंबई उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य मुंबई मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमोल कीर्तिकर आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार रवींद्र वायकर  लोकसभेच्या रिंगणात आहेत. 



संबंधित बातम्या :


North West Lok Sabha: वडिलांची उणीव जाणवली, प्रचार करताना दमछाक, पण जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी साथ दिली; मतदानाला निघताना अमोल कीर्तिकरांनी मनातील भावना बोलून दाखवल्या


Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 227 कोट्यधीश उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, महाराष्ट्रातून कोण?