Sanjay Jadhav on Manoj Jarange Patil, Parabhani : 'लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगेंचा (Manoj Jarange Patil) फायदा मला व बीडमधील बजरंग सोनवणेंना झाला', अशी जाहीर कबुली परभणीचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी दिली आहे. ते परभणीत बोलत होते. 


मराठा समाज एकटवून माझ्या पाठिशी उभा राहिला


संजय जाधव म्हणाले, कालपर्यंत वेगळी होणारी निवडणूक एकदम जातीवर गेली. त्याचा दगाफटका भविष्यात काय काय होईल हे आत्ताच सांगू शकत नाही. पण, दोन समजात वितुष्ट निर्माण झालंय ही वस्तूस्थिती आहे. जे पेरलं तेच उगवणार, ज्या पद्धतीने लोकांनी महादेव जानकरांचा प्रचार केला, त्याची रिएक्शन मराठा समाजात उमटली . त्यामुळे मराठा समाज एकटवून माझ्या पाठिशी उभा राहिला. हे मी मानणारा आहे, असेही संजय जाधव यांनी स्पष्ट केले. 


मनोज जरांगेंचा मराठवाड्यातील जिल्ह्यांत प्रभाव 


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची त्यांनी एकप्रकारे मान्यता मिळाली होती. मराठा समाज त्यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या लढ्यात उतरला होता. मात्र, अंतरवाली सराटी येथे झालेला लाठीचार्ज त्यानंतर जरांगेंनी केलेली उपोषण यांमुळे संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्र ढवळून निघाला होता. मात्र, जरांगेंची सगेसोयरेंच्या आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही. शिवाय, 10 टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचे मनोज जरांगेंनी म्हटलं. त्यामुळे निवडणूकीत असं पाडा की यांच्या सात पिढ्या उभा राहाता कामा नये ,असं आवाहन जरांगेंनी केलं. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जागांवर मनोज जरांगेंचा प्रभाव जाणवणार असल्याचे बोलले जात आहे. 


परभणीत संजय जाधव वि. महादेव जानकर


परभणी लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर महायुतीकडून महादेव जानकर यांना रिंगणात उतरवण्यात आले. त्यामुळे परभणीत असलेला ओबीसी व्होटर जानकर यांच्या पाठिशी उभा राहिला तर मराठा मतदाराने संजय जाधव यांना साथ दिल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, बीड लोकसभा मतदारसंघातही असाच सामना पाहायला मिळाला. बीडमध्ये भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग बाप्पा सोनवणे यांना मैदानात उतरवले. परभणीप्रमाणेच बीडमध्ये मराठा आणि ओबीसी मतदारांनी इर्षेने मतदान केल्याचे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Baramati Loksabha : मोठी बातमी : बारामतीत मतदानावेळी पैसे वाटल्याचा आरोप, रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओंची निवडणूक आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल