एक्स्प्लोर

Rajya Sabha Election : महायुतीचे उमेदवार उद्या एकत्र येत उमेदवारी अर्ज भरणार

Rajya sabha Election : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya sabha Election) अर्ज भरण्याची गुरुवारी (दि.15) शेवटची तारिख आहे. दरम्यान, महायुतीचे सर्व उमेदवार उद्या एकत्रित येत अर्ज भरणार आहेत.

Rajya sabha Election : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya sabha Election) अर्ज भरण्याची गुरुवारी (दि.15) शेवटची तारिख आहे. दरम्यान, महायुतीचे सर्व उमेदवार उद्या एकत्रित येत अर्ज भरणार आहेत. महायुतीचे सर्व उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरतील, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी उपस्थित असणार आहेत. उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुती अॅक्शन मोडमध्ये आली आहे. 

महायुतीच्या उमेदवारांची घोषणा 

राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी भाजप आणि शिंदे गटाकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिंदे गटाकडून काँग्रेसमधून नुकतेच आलेल्या मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीकडून आत्तापर्यंत एकूण चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे भाजपने अशोक चव्हाण यांच्या रुपाने बाहेरुन आलेल्या नेत्याला लगेच राज्यसभेवर पाठवले. त्यामुळे भाजपचे निष्ठावंत आणि सामान्य केडरमध्ये नाराजी पसरण्याचा धोका होता. परंतु, त्याचवेळी मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे या निष्ठावंतांना संधी देऊन भाजप नेतृत्त्वाने एकप्रकारे बॅलन्स साधला आहे. 

महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर 

भाजपचे उमेदवार - अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजीत गोपछडे

शिंदे गटाचे उमेदवार  - मिलिंद देवरा

अजित पवार गट - प्रफुल्ल पटेल 

काँग्रेसचाही उमेदवार जाहीर 
 
काँग्रेसकडून (Congress) चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडूनही राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections 2024) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीये. या यादीत चंद्रकांत हांडोरे यांचे नाव आहे. काँग्रेसने यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे.

भाजपने चौथा उमेदवार दिला नसल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणुक होणार आहे. या सहा जागांसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांना राज्यसभेच्या रुपाने फळ मिळालं आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये मंगळवारी (दि.13) अडीच तास चर्चा झाली. मतं मिळवणे कठीण असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपने चौथा उमेदवार देणे टाळलंय. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवारांना पाडलं पाहिजे; पक्ष आणि चिन्ह मिळताच अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना थेट कानमंत्र!

महत्त्वाच्या बातम्या

डीजे वाजणारच! तो बंद करुन दाखवाच, गुणरत्न सदावर्तेंचं राज ठाकरेंना आव्हान, म्हणाले, कोणाला त्रास होत असेल तर मला कॉल करा
डीजे वाजणारच! तो बंद करुन दाखवाच, गुणरत्न सदावर्तेंचं राज ठाकरेंना आव्हान, म्हणाले, कोणाला त्रास होत असेल तर मला कॉल करा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
राज ठाकरेंनी भावाकडं ज्ञान पाजळावं, शिवसेना भवनमधील फोटो प्रोटोकॉल प्रमाणे आहे का? 15 दिवसात तो फोटो काढा अन्यथा... सदावर्तेंचा ठाकरेंना इशारा
राज ठाकरेंनी भावाकडं ज्ञान पाजळावं, शिवसेना भवनमधील फोटो प्रोटोकॉल प्रमाणे आहे का? 15 दिवसात तो फोटो काढा अन्यथा... सदावर्तेंचा ठाकरेंना इशारा
औषध निरीक्षक पेपरफुटीत सहभाग आढळल्यास आयोगातल्या व्यक्तीलाही कठोर शिक्षा होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा विद्यार्थ्यांना शब्द
औषध निरीक्षक पेपरफुटीत सहभाग आढळल्यास आयोगातल्या व्यक्तीलाही कठोर शिक्षा होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा विद्यार्थ्यांना शब्द

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
Iran War Live Update: गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली,एका व्यक्तीचा मृत्यू, 3 जण गंभीर, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, एका व्यक्तीचा मृत्यू, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
Embed widget