एक्स्प्लोर

काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे राज्यसभेच्या रिंगणात

Chandrakant Handore: चंद्रकांत हांडोरे आगामी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे महाराष्ट्रातून उमेदवार असतील. काँग्रेसनं यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे.

Rajya Sabha Election 2024: महाराष्ट्र काँग्रेसकडून (Maharashtra Congress) चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore)यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. काँग्रेसकडून राज्यसभा (Rajya Sabha Elections 2024) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत चंद्रकांत हांडोरे यांचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, चंद्रकांत हांडोरे यांचा गेल्या राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला होता. याच मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली होती. अशातच आता पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींनी चंद्रकांत हांडोरेंवर विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. 

चंद्रकांत हांडोरे आगामी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे महाराष्ट्रातून उमेदवार असतील. काँग्रेसनं यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे. याचाच अर्थ स्पष्ट होतंय की, आता भाजप आणि  मित्रपक्षांकडून यंदा महाराष्ट्रासाठी पाच उमेदवार दिले जाऊ शकतात. म्हणजे, काँग्रेसनं भाजप आणि मित्रपक्षांचे पाचही उमेदवार निवडून येतील, हे कुठे ना कुठे मान्य केलं आहे, असं स्पष्ट होत आहे. 

काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्या राज्यसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. काँग्रेसकडून राज्यसभेची यादी जाहीर करण्यात आली आहे. सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत. याव्यतिरिक्त बिहारमधून अखिलेशप्रताप सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. यासोबतच काँग्रेस महाराष्ट्रात विधानसभेची एकच जागा लढवणार आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. 

राज्यसभेसाठी काँग्रेसची यादी जाहीर, पाहा कोणा-कोणाला मिळाली उमेदवारी? 

  • काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी : राजस्थान 
  • अखिलेश सिंह : बिहार 
  • अभिषेक मनू सिंघवी : हिमाचल प्रदेश 
  • चंद्रकांत हांडोरे : महाराष्ट्र 

दरम्यान, 2022 मध्ये महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या होत्या. त्यावेळी चंद्रकांत हांडोरे पहिल्या पसंतीचे उमेदवार असूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली होती. महाविकास आघाडी राज्यसभेसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न करेल, असं बोललं जात होतं. पण, आता जे दिसतंय त्यानुसार, काँग्रेसनं सावध पवित्रा घेतला असून चंद्रकांत हांडोरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच, असं असलं तरी अद्याप भाजपनं मात्र, अद्याप राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये चंद्रकांत हांडोरेंचा पराभव झाला होता आणि त्यावेळी भाजपनं जी रणनिती आखली होती, त्याप्रकारची रणनिती राज्यसभेसाठीही आखली जाऊ शकते का? तसेच, राज्यसभेसाठी भाजप महाराष्ट्रात पाच उमेदवार देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sharad Pawar Camp Merger in Congress: सोबत या, पक्ष विलीन करा, एकाच चिन्हावर लढू; काँग्रेसचा शरद पवारांना मोठा प्रस्ताव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget