Rajendra Raut Meet Manoj Jarange Patil, Jalna : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज (दि.8) पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) पोहोचले आहेत. राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महत्वपूर्ण ठरल्यानंतर आमदार-खासदार अंतरवाली सराटीत जाऊन उपोषणाला पाठिंबा देत आहेत. 


संजय जाधवांचाही मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा 


लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फॅक्टर महत्वपूर्ण ठरला. निवडणुकीत यश मिळवल्यानंतर परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी मला मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा झाला असं म्हटलं. तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी विजय मिळवल्यानंतर थेट मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या विजयाचे श्रेयही जरांगे पाटील यांना दिले. नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर शिवाय अनेक लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव पाहायला मिळाल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. काही उमेदवारांनी स्वत: मनोज जरांगेंचा फायद झाल्याचे स्पष्ट केले आहे. 


सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, मनोज जरांगे पाटलांचा इशारा 


मनोज जरांगे पाटील यांनी सगे सोयऱ्याच्या आरक्षणाची मागणी केली आहे.  फडणवीस साहेब तुम्ही भ्रमात राहू नका, मी कोण्या पक्षाचा नाही. केसेस मागे घ्या, सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, महामंडळाच्या अटी शर्ती दूर करा, मराठ्यांचा रोष घेऊ नका. यांनी आता ताज थोबाड फोडलं, मागे त्यांनी फोडलं, महाविकास आणि महायुतीचा विषय नाही. महाविकास आघाडीने काही आम्हाला तुपाचे डबे दिले नाहीत,असा इशारा मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. 106 आमदार मराठा समाजाने निवडून दिले आहेत. आता तुम्ही 10 टक्के आरक्षण दिलं, त्यात अनेक अडचणी येत आहेत. देवेंद्र फडणवीस तुम्ही आरक्षण दिले तेव्हा मराठ्यांनी तुमचा उपकार फेडला, तुम्हाला निवडून दिले. त्यांनी आणखीन गैरसमजात राहू नये. तुम्ही आरक्षण दिलं, तुमचे उपकार मराठा समाजाने फेडले आहे,असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.




इतर महत्वाच्या बातम्या 


Devendra Fadanvis : मराठा समाजाला सर्वकाही आपण  दिलं, पण मतं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या पारड्यात गेली: देवेंद्र फडणवीस