Manoj Jarange Patil : "आमीच मार खाल्ला आमच्यावरच केसेस झाल्या, मग समज आहे झाला असे कसे म्हणून शकता? फडणवीस साहेब तुम्ही भ्रमात राहू नका, मी कोण्या पक्षाचा नाही. केसेस मागे घ्या, सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, महामंडळाच्या अटी शर्ती दूर करा, मराठ्यांचा रोष घेऊ नका. यांनी आता ताज थोबाड फोडलं, मागे त्यांनी फोडलं, महाविकास आणि महायुतीचा विषय नाही. महाविकास आघाडीने काही आम्हाला तुपाचे डबे दिले नाहीत", असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले. ते अंतरवाली सराटीमध्ये बोलत होते. 


तुम्ही आरक्षण दिलं, तुमचे उपकार मराठा समाजाने फेडले


मनोज जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस तुम्ही आरक्षण दिले तेव्हा मराठ्यांनी तुमचा उपकार फेडला, तुम्हाला निवडून दिले. त्यांनी आणखीन गैरसमजात राहू नये. तुम्ही आरक्षण दिलं, तुमचे उपकार मराठा समाजाने फेडले आहे. 106 आमदार मराठा समाजाने निवडून दिले आहेत. आता तुम्ही 10 टक्के आरक्षण दिलं, त्यात अनेक अडचणी येत आहेत, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. 


तुमची दीडशे किलोमीटर रॅली निघाली तरी आम्ही खपाखप पाडणार 


पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुमची दीडशे किलोमीटर रॅली निघाली तरी आम्ही खपाखप पाडणार आहोत. तुम्ही जर आमचे ठरल्याप्रमाणे सगेसोयरेचे आरक्षण दिले नाही तर तुम्ही कितीही टक्के पडणारे असले तरी आम्ही तुम्हाला येऊ देणार नाही. गावखेड्यातील मराठा आणि obc एक आहेत. माझ्या गरीबाच्या मताला  किंमत नव्हती ती मिळाली, अजून विधासभेला बघा, आम्ही 5-6 जाती कार्यक्रमच लावणार आहोत. तुम्ही चतुर असाल तर आम्ही महाचतूर आहोत.


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात लागलेल्या निकालाबाबत देवेंद्र फडणवीसांनी आश्चर्य व्यक्त केले. फडणवीस म्हणाले,मराठवाड्यातील मराठा समाजामध्ये विरोधी पक्षाकडून नॅरेटिव्ह तयार केला गेला. मराठा समाजाला दोन्ही वेळा आपण आरक्षण दिलं. सारथी संस्था, फी सवलत, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामडंळ, हॉस्टेल योजना या सगळ्या गोष्टी आपल्या काळात झाल्या. असं असलं तरीही ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणला विरोध केला, त्यांच्यात पारड्यात हे मतदान गेलं. पण हे नॅरेटिव्ह जास्त काळ टिकणार नाही.


इतर महत्वाच्या बातम्या 


Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती, पुरंदरचा तह करुन पुन्हा सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा : देवेंद्र फडणवीस