Rajan Salvi, Kokan : "विधानसभेत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साळवी यांनी भाजप प्रवेशाची चाचपणी सुरू केली", असा गौप्यस्फोट ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विलास चाळके यांनी केलाय. गेल्या काही महिन्यांपासून राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. मात्र, राजन साळवींनी कोणत्या पक्षात जाणार याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. दरम्यान, राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर पक्षातील स्थानिक नेत्यांनी राजन साळवींवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केलीये. 


विलास चालके काय काय म्हणाले? 


ज्यांना गद्दार बोलले त्यांच्यासोबत साळवी जातील असं वाटत नाही; राजन साळवी हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. राजन साळवी यांना पाच वेळा एबी फॉर्म दिला आणि तीन वेळा आमदार म्हणून पक्षाने निवडून आणलं. राजन साळवी कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांच्यासोबत कोणीही कार्यकर्ता जाणार नाही, असा विश्वासही जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी व्यक्त केला. 
 
पुढे बोलताना विलास चाळके म्हणाले, राजन साळवी हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. त्यामुळे ज्यांना गद्दार बोलले त्यांच्यासोबत राजन साळवी जातील असं वाटत नसल्याचं शिवसेनेचा ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विलास चाळके यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप आणि त्यानंतर शिंदे शिवसेना त्यांच्यासोबत जाण्याची वेळ आणि राजन साळवी यांची फरपट का होते? याचा विचार देखील साळवी यांनी करावा असा घरचा आहेर देखील चाळके यांनी दिला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर केवळ दुसऱ्याच दिवशी राजन साळवी यांनी भाजपची चाचपणी सुरु केली होती. त्यामुळे हा मोठा धक्का आम्हाला बसला होता असं देखील चाळके यांनी म्हटलं असून साळवी कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांच्यासोबत कुणीही जाणार नाही, अशी टीका देखील चाळके यांनी केली आहे.


दरम्यान, सामंत बंधूंचा राजन साळवी यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला विरोध नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी बोलताना सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीत किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा पराभव केला आहे. त्याच्या जवळचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पक्षात आले आहे व येत आहे. त्यामुळे राजन साळवी यांना पक्षात घेतांना एकनाथ शिंदे सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेईल, असे उदय सामंत म्हणाले आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Santosh Deshmukh Case: वडिलांच्या आठवणीने वैभवीची आर्त हाक, धनंजय देशमुखांचा न्यायासाठी संघर्ष, संतोष देशमुख प्रकरणाचा 60 दिवसांचा स्पेशल रिपोर्ट