Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या होऊन आज दोन महिने पूर्ण झाले. ही हत्या इतक्या निर्घृणपणे करण्यात आली होती की या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले. या हत्याप्रकरणी वाल्मिक कराडला मकोकाअंतर्गत अटक झाल्यानंतर कराडशी आर्थिक संबंध, खंडणीप्रकरणातही धनंजय मुंडेचा हात असल्याचा आरोप होतोय.धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी चांगलाच जोर धरत आहे. खंडणी, वाढती गुन्हेगारी, धाकदपट,राखेतून येणारी मुजोरी,गुंडगिरी, बंदुकींचा सर्रास वापर आणि केवळ राजकीय नाही तर जातीय संघर्ष निर्माण झालेल्या या हत्याकांडाचा मागोवा घेणारा 'ABP माझा'चा स्पेशल रिपोर्ट पाहूया.. (Beed)


आणखी किती धीर धरणार...? माझे बाबा परत येणार आहेत का? धनंजय आणि वैभवी देशमुखचे हे शब्द कानी पडले की अगदी हृदय पिळवटून निघत जाते. भावाची निर्घृण हत्या झाल्यानंतर खंबीरपणे कुटुंबासमवेत उभा असलेला धनंजय देशमुख आता मात्र प्रश्न विचारतोय की मी आणखी किती दिवस धीर धरू ? तपास पूर्ण होईल पण यातून माझे बाबा परत येणार आहेत का असा प्रश्न विचारणारी वैभवी माझ्यासोबत जे घडले आहे ते इतर कुठल्या मुली सोबत घडू नये असे विनवणी करत आहे.दरम्यान,संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटक झालेले सगळे आरोपी हे सध्या जेलमध्ये आहेत. याप्रकरणी अटकेत असलेल्या सुदर्शन घुलेच्या मोबाईल तपासणीसाठी त्याला जेलमधून बाहेर काढण्यात आले आणि पुन्हा त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली. एक महिना ताब्यात घेतल्यानंतरसुद्धा सुदर्शन घुले चा मोबाईल त्याचवेळी का तपासला नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय. यासोबतच सुदर्शन घुलेच्या मोबाईलवरून कोणता डाटा रिकव्हर झाला हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(Maharashtra)


आरोपीसोबत अनेकजण संपर्कात..कारवाई का होत नाही?


संतोष देशमुख यांचे अपहरण झाले त्यापूर्वी खंडणी मागण्यात आली आणि त्यानंतर अपर्णानंतर त्यांचा खून झाला या सगळ्या प्रकरणांमध्ये जो काही संवाद झाला तो मोबाईलवर झाला म्हणून केवळ संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर नाही, तर त्यापूर्वीसुद्धा हे आरोपी कोणासोबत काय बोलले होते? नेमका काय कट शिजला होता? या संदर्भात पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे. 10 आरोपीवर अद्याप कारवाई झालेली असली तरी याप्रकरणी अनेक जण या आरोपीच्या संपर्कात होते त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.


वाल्मिकच नाही, धनजंय मुंडेही दोषी?


संतोष देशमुख हत्याप्रकरणांमध्ये वाल्मिक कराडचा हात आहे, असा आरोप सुरुवातीपासूनच या प्रकरणांमध्ये होत आहे आणि म्हणूनच सीआयडी कडून वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा सुरू आहे.मात्र केवळ वाल्मिक कराडच यात दोष आहे असं नाही तर वाल्मिक कराडला मदत करणारे धनंजय मुंडेसुद्धा याप्रकरणी दोषी असल्याचा आरोप सुरुवातीपासूनच या प्रकरणांमध्ये करण्यात आला आहे .एवढेच नाही तर आता धनंजय मुंडे यांनीसुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे..


या हत्या प्रकरणानंतर केवळ एका प्रकरणाच्या संदर्भातलाच तपास झाला असं नाही तर बीड जिल्ह्यामध्ये अवैध पद्धतीने ज्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत होत्या त्या संदर्भात सुद्धा आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवला. अगदी अनधिकृत परवानाधारक पिस्तूल वापरण्यापासून ते वाळू उपसा तसेच राखेची अवैध्य वाहतूक यासंदर्भात सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या सगळ्या घटनांच्या मागे वाल्मिक कराडचा हात असल्याचे सुद्धा पुरावे सुरेश धस देत आहेत.


हत्या प्रकरणाला 60 दिवस पूर्ण


संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 60 दिवस पूर्ण झाल्यानंतर सुद्धा सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत.. यातील आरोपींना जेरबंद केले असले तरी एक आरोपी आणखी पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.. याप्रकरणी लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करून यातील दोषी आरोपींना जोपर्यंत शिक्षा सुनावली जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही, हेच वास्तव आहे.


हेही वाचा:


Dhananjay Deshmukh: ..आता माझाही बांध फुटलाय, संतोष देशमुख प्रकरणी 60 दिवसांनंतर धनंजय देशमुख म्हणाले, 'आता माझा भाऊ ..