Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE Updates: मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो : राज ठाकरे
Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE Updates: संपूर्ण ठाकरे कुुटंब एकाच फ्रेममध्ये, व्यासपीठावर राज, उद्धव यांच्यासह रश्मी, शर्मिला, आदित्य, अमित, तेजस यांचं एकत्र फोटोसेशन...
पार्श्वभूमी
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE Updates: एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असा नारा देत मराठीच्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन झालं. राज ठाकरे आणि उद्धव...More
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE: विजयी मेळावा संपल्यानंतर राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, "हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो."
Video: न भूतो न भविष्यती असा ग्रँड सोहळा आज मुंबईतील (Mumbai) वरळी डोम येथे पार पडला. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे या सोहळ्यात केवळ ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच एकत्र आले नाही, तर ठाकरे कुटुंबीय एकत्र पाहायला मिळाले. ठाकरेंची चौथी पिढीही व्यासपीठावर एकत्र दिसून आली, मनसेचे नेते अमित ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे चुलत भाऊ देखील मराठीच्या मुद्द्यावरुन आयोजित विजय जल्लोष मेळाव्यासाठी एकत्र आले. यावेळी, दोन भावांना जवळ घेऊन फॅमिली फोटो फ्रेम देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सुप्रिया सुळे आत्याबाईंच्या भूमिकेत दिसले, ज्यांनी दोन्ही भाच्यांना हाताला धरुन एकमेकांना जवळ आणलं.
Shiv Sena Shinde Faction on Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लबोल केला. एक गद्दार बोलला, जय गुजरात. किती लाचारी करायची? हिंदी सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा विचारांचा पाईक होईल का? असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आता यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Sushil Kedia on Raj Thackeray : “राज ठाकरे, तुम्ही लक्षात घ्या की मुंबईत 30 वर्षे राहूनही मला मराठी नीट येत नाही, आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करतात, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही" असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंना आव्हान देणारा उद्योजक सुशील केडिया आता नरमला आहे. राज ठाकरेंना आव्हान दिल्यानंतर मराठी माणसांनी सुशील केडियाला खळखट्याकने प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर सुशील केडिया याने राज ठाकरेंची माफी मागितली आहे.
Praveen Darekar on Raj Thackeray & Uddhav Thackeray: उद्धव आणि मी 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायला, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, अशी मार्मिक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. तर बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर आज भेट झाली. आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षदा टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: विजयी मेळाव्याची सांगता होताच, शिवसेनेच्या (ठाकरे गट) ऑफिशियल ट्विटर हॅडलवरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. फोटोमध्ये राज-उद्धव यांचा एकत्र फोटो आणि त्यावर 'महाराष्ट्राचे वाघ' असं कॅप्शन दिलं आहे.
Dharashiv LIVE: धाराशिवच्या कळंब शहरात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केलाय. आज मुंबईत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत त्रिभाषा सूत्र रद्द केल्याबद्दल विजय मेळावा घेतला. याच संदर्भात शिवसेना ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला. यावेळी ठाकरे बंधू आगे बढो च्या घोषणा देण्यात आल्या.
Sanjay Shirsat On Raj-Uddhav Marathi Vijay Sabha LIVE Updates: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या एकत्र मेळाव्यानंतर शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, "आजचा जो त्यांचा मेळावा झाला, तो चांगला झाला, महाराष्ट्रानं पाहिलं दोन भाऊ एकत्र आलेत. मात्र सर्वांची नजर राज ठाकरे यांच्याकडे होती. राज यांचा रोख कोणाकडे याकडे लक्ष होतं.
"राज ठाकरेंनी अत्यंत संयमी आणि मुद्देसूद भाषण केलं. मराठी का हवी, हिंदी का नको, घडलेल्या घटनेवर आधारित त्यांचा भाषण होत... काही लोक राजकीय अंदाज बांधण्याचा लागले होते, मात्र काहीही नाही. मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी एकत्र आलो, असं राज ठाकरे म्हणाले. कार्यक्रमाला सुप्रिया सुळे, काही कॉम्रेड इत्यादी इतर पक्षाचे नेते आले होते, त्यांनी सांगितिक असेल. पक्ष बाबत न बोलता फक्त मराठी बाबत बोलावं."
Ashish Shelar On Raj-Uddhav Marathi Vijay Sabha LIVE: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा संपल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी एक ट्वीट केलं आहे. आशिष शेलार म्हणाले आहेत की, "भाषेसाठी नाही ही तर... निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी! महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता "भाऊबंदकी" आठवली... ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता. भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच... आणि ते यांच्या लेखी नाहीच! महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार... त्यासाठी सत्ता.. यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरें यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे... निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंबतहात जिंकण्याचा प्रयत्न..."
Raj Thackeray & Uddhav Thackeray Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी वरळी डोमच्या परिसरामध्ये अभूतपूर्व गर्दी झाली आहे. आज (5 जुलै) सकाळी साडेदहा वाजता वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्याला वेळ देण्यात आली होती. मात्र दोन तास आधीच वरळी डोम हाऊसफुल्ल झाला. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला महाराष्ट्रातून प्रचंड अशी मराठी सॅल्युट देण्यात आली आहे अशी चर्चा आहे. ठाकरे बंधूंच्या होणाऱ्या मेळाव्याकडे फक्त राज्याचे लक्ष नसून अवघ्या देशाचे लक्ष आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने राज आणि उद्धव यांच्यात मनोमिलन हे कायमस्वरूपी होणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
मुंबई: मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू आज विजयी मेळावा घेत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. या कार्यक्रमासाठी प्रंचड गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. मेळाव्याच्या ठिकाणी मोठ्य प्रमाणावर लोक जमा झाले आहेत. मेळाव्याचे ठिकाणी तुडूंब गर्दी झाली आहे. दोन्ही भाऊ मेळाव्यासाठी एकाच वेळी घराबाहेर पडले आहेत. राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे हे एकाचवेळी घराबाहेर पडले असून ते दोघांच्या गाड्या एकत्र वरळी परिसरात पोहोचल्या आहेत. राज ठाकरे शिवतीर्थवरून तर उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन मेळाव्याकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांचा एकत्रच एन्ट्रीचा प्लॅन असल्याच्या चर्चा आता उपस्थितांमध्ये रंगल्या आहेत.
Raj Thackeray: महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा वरवंटा फिरवण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट पसरली. या संताप विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सरकारला हिंदी सक्तीचा जीआरद्द करावा लागला. या सर्व पार्श्वभूमीवर आज (5 जुलै) विजय मेळावा वरळी डोममध्ये झाला. या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरून घणाघाती प्रचार केला. राज ठाकरे यांनी बोलताना सुरुवातीलाच सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणत मी उपस्थितांचे मनी जिंकली. त्यानंतर त्यांनी नेहमी प्रमाणे माझ्या जमलेल्या दमा मराठी बांधवांनो अशी सुरुवात केली. आजवर कोणालाच जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवल्याचा टोलाही राज यांनी लगावला.
Raj Thackeray speech in Mumbai Rally: उद्धव आणि मी 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायला, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, अशी मार्मिक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. ते शनिवारी वरळी डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंचे मनोमिलन होताना दिसले. यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केले.
Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा राज्य सरकारकडून 29 जून रोजी करण्यात आली होती. त्यानंतर विजयी मेळाव्याचं आयोजन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वरळीतील डोममध्ये करण्यात आलं आहे. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे. सरकारला फक्त मोर्चाच्या चर्चेनं माघार घ्यावी लागली. आजच्या मेळाव्यात किंवा यापुढं देखील मराठीच्या मुद्यावर कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा असेल, असं राज ठाकरे म्हणाले. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्या कडे सत्ता आहे रस्त्यावर असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
Raj Thackeray Uddhav Thackeray Video मुंबई: कोणत्याही वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मी (राज ठाकरे) एकत्र आलो आहे. आम्हाला एकत्र आणायचं बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही कुणालाच जमलं नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जमलं, असं मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. राज ठाकरेंनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतची एक आठवणही राज ठाकरेंनी सांगितली. दरम्यान, राज ठाकरेंचं भाषण संपताच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत हात मिळवला आणि त्यांची पाठही थोपटली. ठाकरे बंधूंचा यादरम्यानचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
Raj Thackeray LIVE: मराठी प्रेम आमच्या धमन्यांमध्ये नेमकं आलो कुठून? महाराष्ट्रासाठी मराठीसाठी मी एवढा कडवट का झालो? यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचे अनेक प्रसंग आहे त्यातला एक प्रसंग मला आज आवर्जून सांगू का वाटतो. कारण आमच्यासाठी हे बाळकडू खऱ्या अर्थाने बाळकडूच होतं. असे सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या सोबतचा खास प्रसंग सांगत आपल्या भाषणाचा शेवट केला.
हा प्रसंग 1999 सालचा आहे. यावर्षी शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही याबद्दल संभ्रम होता. याच वेळी शरद पवार यांनी आपला राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला होता. यावेळी सत्ता स्थापनेच्या वादामध्ये तेव्हा काहीच होत नव्हतं. दिवस उजाडत होते मात्र मार्ग निघत नव्हता. त्यातच एके दिवशी दुपारी मातोश्री पुढे दोन गाड्या लागल्या. यावेळी प्रकाश जावडेकर हे आणि काही मंडळी आमच्याकडे आली. आणि म्हणू लागली की बाळासाहेबांना भेटायचं आहे. मात्र बाळासाहेबांच्या आरामाची ती वेळ असल्यामुळे त्यांना मी भेटण्यास नकार दिला. मात्र ही भेट महत्त्वाची असल्याचे सांगत मी बाळासाहेबांना केवळ त्याचा निरोप दिला.
Uddhav Thackeray Speech Today: महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला.
Raj Thackeray: पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी संयुक्त मोर्चा काढण्याचे ठरवल्यानंतर शासनाला जीआर रद्द करावा लागला . या पार्श्वभूमीवर आज वरळी डोममध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडला . यावेळी सन्माननीय उद्धव ठाकरे अशी सुरुवात करत राज ठाकरे मराठीवरून पुन्हा कडाडले . महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरातींना मराठी आलीच पाहिजे यात वाद नाही .विनाकारण मारामारी करायची गरज नाही .पण जास्त नाटक केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही ..असं म्हणत राज ठाकरेंनी फटकारलं . यावेळी सभेला जमलेल्या मनसैनिकांसह सर्वांनी टाळ्या शिट्ट्या वाजवत दाद दिली . सरकारचं पुढचं राजकारण तुम्हाला जातीजातीत विभागण्याचा आहे असे सांगत राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं.
Uddhav Thackeray Speech Today: सक्ती करण्याचा प्रयत्न केला, तर शक्ती अशी दाखवू पुन्हा डोकं वर काढणार नाही, असा गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. म महापालिकेचा नाही, महाराष्ट्राचा सुद्धा आहे, आम्ही तो काबीज करू, असेही उद्धव यांनी निक्षून सांगताना राज यांच्यासोबत युतीचे संकेत दिले. उद्धव ठाकरे यांनी मराठे मराठेतर, ब्राह्मण बाह्मणेतर, कोकण कोकणेतर असा कोणताही भेदभाव न करता मराठी म्हणून एकजूद दाखवा. आपली ताकद एकजुटीसाठी असली पाहिजे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. वरळी डोममध्ये आज मराठी विजयोत्सव साजरा करण्यात आला. या मेळाव्याला राज आणि उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले.
Uddhav Thackeray Raj Thackeray Rally Mumbai Marathi Vijay Sabha LIVE Updates: राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यासाठी इतर पक्षांची मंडळीही उपस्थित होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भाषणं झाल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व नेतेमंडळींना मंचावर बोलावलं आणि गुढी उभारण्यात आली. त्यावेळी राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आमदार आदित्य ठाकरे यांनाही मंचावर आमंत्रित करण्यात आलं. त्यावेळी दोघे भाऊ एकमेकांसोबत मंचावर एकत्र आले आणि सर्वांना अभिवादन केलं. तसेच, एकमेकांना मिठीही मारली. त्यानंतर ठाकरे फॅमिलीचं फोटोसेशन झालं.
Uddhav Thackeray LIVE: उद्धव ठाकरे म्हणाले की, "आमचा हनुमान चालीसाला विरोध नाही हनुमान स्त्रोत आहे ना, काल एक गद्दार बोलला जय गुजरात… अरे किती लाचार होणार. पुष्पा चित्रपटात दाढीवर हात फिरवून म्हणतो झुकेगा नही साला हा म्हणतो उठेगा नही साला..."
Uddhav Thackeray Raj Thackeray Rally Mumbai Marathi Vijay Sabha LIVE Updates: उद्धव ठाकरे म्हणाले की, "विधानसभेत बटेंगे तो कटेंगे म्हणाले हिंदू मुस्लिम तर केलं परंतु मराठी अमराठी देखील केलं. त्यांनी गुजरात मधे एके काळी पटेल लोकांना भडकवल आणि पटेल विरुद्ध बाकी एकत्र केलं राजस्थान मधे तेच केलं जाट समाज भडकवला आणि इतर त्यांच्या विरोधात उभे केले. इथ देखील तेच महाराष्ट्रात केलं मराठा समाजाला भडकवल आणि बाकी एकत्र केले बटेंगे तो कटेंगे म्हणाले."
Uddhav Thackeray LIVE: उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. देवेंद्र फडणवीस यांच वक्तव्य म्हणजे मला सका पाटलांची आठवण येते त्यावेळी काँग्रेस सत्तेवर होती. मुंबई आपल्या हक्कांची आहे लढलो आणि आपण घेतली. काश्मीर मध्ये 370 कलम हटवायला आपण पाठिंबा दिला होता. ते म्हणाले होते एक निशाण एक झेंडा… हिंदी सक्ती आम्ही लावून घेत नसतो. उद्धव ठाकरे यांनी निर्णय आणला म्हणत मी एवढं काम करत होतो तर सरकार पाडलं कशाला? महाराष्ट्रात मराठी सक्ती केल्यावर तो भेडिया बोलतोय. मराठी माणूस मुंबई बाहेर नेला असं तुम्हाला वाटत असेल तर 2014 नंतर मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला गेले कसे? तुम्ही आमच्यात गद्दरी करवली आणि आमच सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे गुजरातला बसले आहेत दोन व्यापारी त्यांच्यासाठी तुम्ही करत आहात. आम्ही एकत्र येणार म्हंटल की, हे भांडण लावतील यांचा म मराठीचा नाही महानगरपालिकेचा आहे, असं म्हणतात अरे महापालिका नाही आमचा म महाराष्ट्राचा आहे."
Uddhav Thackeray LIVE: उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला आज कल्पना आहे, अनेक बुवा महाराज बिझी आहे, कोण लिंबु कापतंय? कोण रेडा कापतोय? माझ्या आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे, आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर हात बाळासाहेब ठाकरे यांचा नसता, तर कुठे असता तुम्ही. मधल्या काळात यांनी सुरू केळं होतं उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत."
Raj Thackeray LIVE: राज ठाकरे म्हणाले की, "नयन शाह नावाचा माझा मित्र आहे, मी त्याला गुजराठी म्हणतो. अतिशय उत्तम मराठी बोलतो. शिवाजी पार्कत फिरताना पूल देशपांडे ऐकतो. बाळासाहेब यांच्या सोबतच एक घटना आहे ती विसरू शकत नाही. मी एके दिवशी दुपारी मातोश्रीला बसलो होतो, त्यावेळी प्रकाश जावडेकर आले. बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आले. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असा निरोप घेऊन आले..."
"मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरलं आहे. मला त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल. असे संस्कार झालेला व्यक्ती मराठीसाठी तडजोड करेल का? मराठीसाठीची एकजूट कायम राहण गरजेचे आहे.", असं राज ठाकरे म्हणाले
Uddhav Thackeray LIVE: विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्मानिय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आजच्या भाषणा पेक्षा आमच एकत्र दिसणं महत्वाच आहे. आमच्या दोघांतील 'अंतरपाट' अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी..."
Raj Thackeray Rally Mumbai Marathi Vijay Sabha LIVE Updates: राज ठाकरे म्हणाले की, "ए आर रेहमान स्टेजवर होता तिथ एक महिला तमिळ भाषेत बोलत होती त्यानंतर हिंदीत बोलू लागली रहमानने स्टेजसोडला… एक भाषा सगळ्यांना बांधून ठेवते? कोणती भाषा? संरक्षण दलात विविध रेजिमेंट आहे. एखादी घटना घडली की सगळे तुटून पडतात ना. आज सगळे तुम्ही मराठी म्हणून एकत्र आला आहेत. आता याच पुढच राजकारण तुम्हाला जातीच राजकारण सुरू करतील."
"आता सुरू केलं आहे यांनी मीरा भाईंदरला व्यापाराच्या कानफाडात मारली. व्यापाऱ्याला मारला म्हणतात अजून तर काहीच केलेल नाही. विनाकारण मारामारी करत नाहीत मात्र जास्त उठबस केली तर कानाखाली आवाज काढला जाईल ज्यावेळी असं काही कराल त्यावेळी वीडियो करू नका. त्यांना सांगू द्या मला मारल मारलं त्यांना म्हणू द्या...", असं राज ठाकरे म्हणाले.
Raj-Uddhav Reunite For Marathi Asmita LIVE: "आमची मुले इंग्रजीत शिकली माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे इंग्रजीत शिकले त्यांचा मराठीवर शंका घेणार का? लालकृष्ण अडवाणी मिशनरी शाळेत शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न घेणार का? उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठी भाषेचा कडवट अभिमान बाळगेल तुम्हाला काय प्रॉब्लम आहे?", असं राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE: राज ठाकरे बोलताना म्हणाले की, "आम्ही मराठी भाषा कधी लादली का? हिंदी फक्त 200 वर्षांपूर्वीची आहे. यांनी आत्ता चाचपडून पहिलं. यांना काय मज्जाक वाटला का सक्ती करायला?"
"काहीही अंगावर लादायलाचा प्रयत्न करतात आता माघार घेतली तर काय करायचं. वेगळा ठिकाणी प्रयत्न करून पहिले. ठाकरेंची मुलं इंग्रजी शाळेत शिकली मग काय झालं?? देवेंद्र फडणवीस इंग्रजी शाळेत शिकले, दादा भुसे मराठी शाळेत शिकून मंत्री झाले. कुणाची मुले कुठे शिकतात याची लिस्ट आहे आमच्याकडे", असं राज ठाकरे म्हणाले.
Raj-Uddhav Reunite For Marathi Asmita LIVE: राज ठाकरे विजयी मेळाव्यात बोलताना सांगितलं की, "आजचा मेळाव्याला घोषणा हीच आहे, कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पहायचं नाही. कुणाला न विचारता निर्णय लादला. तुमच्याकडे सत्ता आहे विधान भवनात आणि आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. दादासाहेब भुसे आले होते म्हणत होते मी काय बोलतो ते ऐकून घ्या. मी म्हणालो ऐकून घेईल पण ऐकून घेणार नाही. मला म्हणे केंद्राच्या शिक्षण धोरणात हिंदी मुद्दा आहे. महाराष्ट्रात यांनी प्रयत्न करून पाहिला. दक्षिणेतील राज्य याना विचारत पण नाही त्याशिवाय का यांनी माघार घेतली. उत्तर प्रदेश बिहार राजस्थान कोणता विषय तिसरा घेणार आहेत. मराठीच तिसरा विषय घ्यायला हवा. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. अमित शाह म्हणतात ज्याला इंग्रजी येत त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणवून. पण तुम्हाला येतं कुठे?"
Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: Raj Thackeray LIVE: मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असून वरळी डोममध्ये आज विजय मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस एकवटतो, ह्याचं चित्र उभं राहील असतं. नुसत्या मोर्चाच्या चर्चेनं माघार घ्यावी लागली. आजचा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. परंतु पावसामुळे हे शक्य झालं नाही."
पुढे बोलताना म्हणाले की, "कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. म्हणून उद्धव ठाकरे आणि मी एकत्र आलो आहे. आम्हाला एकत्र आणायचं बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, कुणालाच जमलं नाही. ते देवेंद्र फडणवीस ह्यांना जमलं."
Thackeray Brothers Reunite For Marathi Asmita LIVE Updates: राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच सुशील केडियाचा नवा VIDEO
Uddhav Thackeray Raj Thackeray Rally Mumbai Marathi Vijay Sabha LIVE Updates: अखेर महाराष्ट्राच्या मनातलं स्वप्न खरं झालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची वरळी डोममध्ये थाटात एन्ट्री, एन्ट्रीला आपले ठाकरे गाणं वाजलं आणि फक्त वरळी डोमच नाहीतर अख्खा महाराष्ट्राच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले.
वरळी डोममधल्या मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकाचवेळी एन्ट्री घेतली. दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली आणि मंचावरुन अवघ्या महाराष्ट्राला अभिवादन केलं.
Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: सुषमा अंधारेंनी महिलांसोबत फेर धरला, मनसेचे राजू पाटील बँडच्या तालावर नाचायला लागले, वरळी डोममध्ये आनंदाला उधाण
Uddhav Thackeray Raj Thackeray Rally Mumbai Marathi Vijay Sabha LIVE Updates : वरळी डोमच्या आतमध्ये प्रंचड गर्दी झाली असून ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा याचीदेही याची डोळा पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र एकवटला आहे. वरळी डोममध्ये मराठी अस्मितेसाठी हाडाचा मराठी माणूस एकत्र आला आहे. आज तिथे जमलेल्या प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना असल्याचं अनेकांनी बोलताना सांगितलं आहे. तसेच, आज ठाकरे बंधू एकत्र येत नाहीयेत, तर मराठी बाणा एकत्र येतोय, अशीही प्रतिक्रिया जमलेल्या अनेकांनी दिली आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE: प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारं विधान केलं आहे. मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, असे केडिया यांनी एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये राज ठाकरे यांना टॅग करत म्हटलेलं. अशातच आता सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं आहे.
Uddhav Thackeray Raj Thackeray Rally Mumbai Marathi Vijay Sabha LIVE Updates: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी तुफान गर्दी झाली आहे. वरळी डोमच्या गेटवर तुफान गर्दी झाली आहे. या गर्दीतून मार्ग काढत मनसे आणि शिवसेनेचे नेते आत येताना पाहायला मिळाले. तरीसुद्धा बऱ्याच मनसे, शिवसेनेच्या नेत्यांना आतमध्ये प्रवेश करणं कठिण झालं.
वरळी डोमच्या गेटवर तुफान गर्दी पाहायला मिळतेय. मनसे, शिवसेनेच्या नेत्यांनाही प्रवेश कठीण झाला. अविनाश जाधव, प्रकाश महाजनही गेटवर अडकले. पोलिसांनी कसाबसा मार्ग काढून पोलिसांनी काही नेत्यांना आत घेतलं. कार्यकर्तांना रोखणं पोलिसांनाही कठीण झालं आहे. वरळी डोममध्ये प्रवेश करण्यासाठी धडपड झाली आहे.
Thackeray Brothers Reunite For Marathi Asmita LIVE Updates: संपूर्ण राज्यासह देशाला ज्या क्षणांची उत्सुकता लागली आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) आज मुंबईत होणार असून या मेळाव्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ वरळी डोममधून आज धडाडणार आहेत. दरम्यान या विजयी मेळाव्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक, मनसेसैनिक आणि मराठीप्रेमींची उपस्थिती बघायला मिळत आहे. अशातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या विशेष निमंत्रणावर थेट अमेरिकेतील मराठी पाहुणेही या मेळाव्यासाठी दाखल झाले आहे.
Sanjay Raut on Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या समोरच जय गुजरातचा नारा दिला. यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. तो कार्यक्रम गुजराती समाजाचा होता. गुजराती समाजाने महाराष्ट्राच्या विकासात दिलेलं जे योगदान आहे त्या अनुषंगाने जय गुजरात म्हटले. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE: वरळी डोममध्ये होऊ घातलेल्या या सोहळ्यात फक्त चार जणांची भाषणं होणार आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे आणि कम्युनिस्ट पक्षाच्या प्रकाश रेड्डी यांचा समावेश आहे. व्यासपीठावर फक्त दोन खुर्च्या असतील. त्या अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी असतील. ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकत्र येण्याचा क्षण हा अत्यंत विशेष आणि लक्षात राहणारा असेल. प्राथमिक माहितीनुसार, वरळी डोमच्या व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हो दोन वेगवेगळ्या मार्गांनी एकाचवेळी प्रवेश करतील. राज-उद्धव व्यासपीठावर येताच एकमेकांकडे पाहतील आणि स्टेजच्या मध्यभागी येऊन मराठी जनतेला अभिवादन करतील. या व्यासपीठावर मोजकीच सजावट करण्यात आली आहे. स्टेजवर दोन खुर्च्या, फुलांची सजावट आणि बॅकड्रॉपला महाराष्ट्राच नकाशा असेल. राज आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र असे ठसवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकत्र आले आहेत, हा संदेश जास्तीत जास्त प्रभावीपणे मराठी मतदारांपर्यंत कसा पोहोचेल, यासाठी मनसे अन् ठाकरे गटाने नियोजन केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची देहबोली आणि प्रत्येक कृतीकडे आज सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally in Mumbai LIVE Updates: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे शनिवारी विजयी मेळाव्याच्यानिमित्ताने 18 वर्षांनी एकत्र येणार आहेत. या विजयी मेळाव्याकडे ठाकरे बंधूंचे (Thackeray Brothers) राजकीय मनोमीलन म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीनं या मेळाव्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना-मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांसोबत मराठी मतदारांच्या मनातही ठाकरे बंधू एकत्र यावेत, ही सुप्त इच्छा होती. ही इच्छा आज प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे नियोजनही तसेच भव्यदिव्य करण्यात आले आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा भव्य विजयी मेळावा शनिवारी (दि. 5) सकाळी दहा वाजता मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबईत जागोजागी बॅनरबाजी करण्यात आली असून, मराठी जनतेला आवाहन करण्यात आले आहे. 'आवाज मराठीचा! या भावनिक संदेशासह ठाकरे बंधूंनी जनतेला विजयी मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally मुंबई: संपूर्ण राज्यासह देशाला ज्या क्षणांची उत्सुकता लागली आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) आज मुंबईत होणार असून या मेळाव्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ वरळी डोममधून आज धडाडणार आहेत. दरम्यान या विजयी मेळाव्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक, मनसेसैनिक आणि मराठीप्रेमींची उपस्थिती बघायला मिळत आहे. अशातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या विशेष निमंत्रणावर थेट अमेरिकेतील मराठी पाहुणेही या मेळाव्यासाठी दाखल झाले आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: आज संपूर्ण राज्याचं लक्ष ठाकरेंच्या विजयी मेळाव्याकडे लागलं आहे. तब्बल 18 वर्षांनंतर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. विजयी मेळाव्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. हिंदीच्या मुद्यावर ठाकरी तोफा धडाडणार आहेत. ठाकरे बंधूंच्या (Uddhav- Raj Thackeray) विजयी मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी 11.30 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसेना, मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मुंबईकडे रवाना झाले आहेत. शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मनात गेल्या कित्येक दिवसांपासून असलेली इच्छा आज अखेर पूर्ण होत आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मनसेमधून शिवसेना ठाकरे गटात आलेले नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सविस्त वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally in Mumbai: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे शनिवारी विजयी मेळाव्याच्यानिमित्ताने 20 वर्षांनी एकत्र येणार आहेत. या विजयी मेळाव्याकडे ठाकरे बंधूंचे (Thackeray Brothers) राजकीय मनोमीलन म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने या मेळाव्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना-मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांसोबत मराठी मतदारांच्या मनातही ठाकरे बंधू एकत्र यावेत, ही सुप्त इच्छा होती. ही इच्छा आज प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे नियोजनही तसेच भव्यदिव्य करण्यात आले आहे.
सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा...
Thackeray Brothers Reunite For Marathi Asmita LIVE Updates: मुंबई वरळी डोममध्ये 'जय जवान गोविंदा पथक' सलामी देणार आहे. 7 थर लावून 'जय जवान गोविंदा पथक' सलमाी देणार आहे. याबाबत जय जवान गोविंदा पथकाचे कोच संदीप ढवळे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. ते म्हणाले की, "मराठीचा हा उत्सव आहे, त्यामुळे या उत्सवाला सलामी देण्यासाठी आम्ही आज थर लावणार आहोत, ज्या-ज्या वेळी मराठी अडचणीत आली किंवा महाराष्ट्रातले सण आले, त्यावेळेस दोन्हीही पक्ष धावून आले, आज आम्ही सात थर लावून मराठीला सलामी देणार आहोत."
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असं रूप घेतलं आहे. त्यातच मराठीत न बोलल्याने मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर आता एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारं विधान केलं आहे. मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, असे केडिया यांनी एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना टॅग करत म्हटलं आहे. त्यानंतर आता काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरुप यांनी ठाकरे बंधूंवर वादग्रस्त टीका केली आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE : ठाकरे बंधूंची तोफ मराठी अस्मितेसाठी धडाडणार आहे. मुंबईच्या वरळी डोममध्ये आज ठाकरेंचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे. अशातच या मेळाव्यासाठी जोगेश्वरीतील प्रसिद्ध 'जय जवान गोविंदा पथक'ही उपस्थित राहणार आहे.
मुंबई वरळी डोममध्ये 'जय जवान गोविंदा पथक' उपस्थित राहणार आहे. 'जय जवान गोविंदा पथक' 7 थर लावून सलामी देणार आहे.
Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: आज मुंबईमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत विजय मेळावा मुंबईत पार पडतोय याच मेळाव्यासाठी नवी मुंबई शहरातून ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी मुंबईसाठी रवाना झाले आहेत. बस प्रवास करणार आहेत त्यामुळे ठाकरे गटामध्ये दोन बंधू एकत्र येत असल्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन ठाकरे एकत्र आल्याने मुंबईत मराठी माणसाची ताकद कायम राहणार असल्याचे पदाधिकारी स्पष्ट करीत आहेत.
Thackeray Brothers Reunite For Marathi Asmita LIVE Updates: मराठी विजय मेळाव्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक हे आता वरळीकडे निघाले आहेत. मुंबई बाहेरील कार्यकर्ते तर रात्रीच मुंबई परिसरात दाखल झाले असून आता कांदिवली परिसरातून देखील मनसैनिक मोठ्या प्रमाणावर वाजत गाजत वरळीतील विजय सभेसाठी निघाले आहेत. मनसे प्रवक्ते हेमंत कांबळे आणि विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसैनिक कोळी बँडच्या तालावर नाचत निघाल्याचे पाहायला मिळत आहे.
Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू आज विजयी मेळावा घेणार आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच आता या मेळाव्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बसणार आहेत. तर, इतर सर्व मान्यवर स्टेजखाली पहिल्या ओळीत बसतील, भाषणं फक्त 4 जणं करतील ऐनवेळी एकादा चेहरा वाढेल, अशी माहिती मिळत आहे.
Thackeray Brothers Reunite For Marathi Asmita LIVE Updates: ठाकरे बंधूंचा विजय मेळावा आज मुंबईमध्ये होत असून या मेळाव्यासाठी पालघरमधून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि मनसैनिक रवाना झाले आहेत. यापुढे ठाकरे बंधू महाराष्ट्रात नवा इतिहास घडवतील, अशी आशा शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: ठाकरे बंधू आज तब्बल 18 वर्षांनी एकाच मंचावर दिसणार आहेत. निमित्त आहे, मराठी अस्मितेचं. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मेळावा घेणार आहेत. दोन बंधू एकत्र येत असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या मुद्दा मराठी अस्मितेचा असला तरीसुद्धा येत्या काळात दोन्ही बंधूंची राजकीय दिलजमाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच या विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंनी खास टीशर्ट वेअर केल्यातं पाहायला मिळतंय. 'आवाज मराठीचा' असं कॅप्शन टीशर्टचा फोटो शेअर करताना संदीप देशपांडेंनी दिलं आहे.
Thackeray Brothers Reunite For Marathi Asmita LIVE Updates: ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी पुण्यातून कार्यकर्ते रवाना होत आहेत. ठाकरे बंधूंचा एकत्रित विजयी मेळावा होत असल्यानं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
Raj-Uddhav Reunite For Marathi Asmita LIVE: Nashik News: ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी नाशिकहून कार्यकर्ते रवाना होत आहेत. शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये विजयी गुढी उभारली. ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने आता दोघांची राजकीय दिलजमाईही व्हावी अशी इच्छा कार्यकर्त्यांनी विजयी गुढी उभारत व्यक्त केली.
Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: आज होणाऱ्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही भाषणं होणार, सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे, उद्धव ठाकरे वरळी डोमला पोहोचणार आहेत, यानंतर कार्यक्रम सुरू होणार आहे. सुरूवातीला प्रकाश रेड्डीचं भाषण होईल त्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांचं भाषण होणार आहे..या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंचही भाषण होणार आहे. त्यानंतर राज ठाकरेंचं भाषण होणार असून उद्धव ठाकरेचं भाषण सगळ्यात शेवटी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान काँग्रेस नेते आल्यास त्यांनाही भाषणाची संधी दिली जाणार आहे.
Raj-Uddhav Reunite For Marathi Asmita LIVE: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार नाहीत. ठाकरे बंधूंनी निमंत्रण पाठवलं नसल्याचा सूर काँग्रेस नेत्यांनी आळवलाय. मेळाव्याला जाण्यापेक्षा ठाकरेंच्या भूमिकेला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. या विजयी मेळाव्यासाठी सर्वपक्षीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले असले, तरीही विजयी जल्लोषाकडे काँग्रेसनं मात्र पाठ फिरवल्याचं कळतंय.
Uddhav Thackeray Raj Thackeray Rally In Mumbai LIVE: ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी नाशिकहून कार्यकर्ते रवाना झाले असून राज्यभरातून शिवसेना, मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मुंबईकडे रवाना झाले आहेत. शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मनात गेल्या कित्येक दिवसांपासून असलेली इच्छा आज अखेर पूर्ण होत आहे. राजकीयदृष्ट्या नसले तरीसुद्धा मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे आता लवकरच राजकीयदृष्ट्याही दोन्ही भाऊ एकत्र येतील, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE: आज विजयी मेळावा होत असला तरी संपूर्ण राज्यालाच नाही तर देशाला पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे... मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन एकत्र आलेले ठाकरे बंधू राजकीय दिलजमाईही करणार काय... आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंची राजकीय युतीही होणार का याची उत्सुकता आहे. त्यादृष्टीने आज ठाकरे बंधू मेळाव्यात मोठी घोषणा करतात का याकडे देशाचं लक्ष लागलंय.
Thackeray Brothers Reunite For Marathi Asmita LIVE Updates: संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे, तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 18 वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. ठाकरे बंधूंची तोफ वरळी डोममधून आज एकत्र, एका सूरात धडाडणार आहेत. या तोफेला बत्ती देण्याचं काम झालं होतं हिंदीच्या मुद्द्यावरून. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्याचा दारूगोळा या ठाकरी तोफेत भरला गेला आणि सरकारला टोकाचा विरोध झाला. ठाकरे बंधूंनी एकत्र आंदोलनाची हाकही दिली. अखेर सरकारला जीआर मागेही घ्यावा लागला. त्यानंतर आता ठाकरे बंधू विजयी मेळावा घेत आहेत. या विजयी मेळाव्यातून ठाकरे बंधूंची सरकारवर तोफ धडाडणार हे निश्चित आहे. पूर्वसंध्येला एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या नाऱ्याने आता ही टीका आणखी प्रखर होणार हेही नव्याने सांगण्याची गरज नाही. सुशील केडीयांच्या मुजोर वक्तव्यानं या टीकेला आणखी धार येणार आहे.
Uddhav Thackeray Raj Thackeray Rally LIVE: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून सकाळी 11.30 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह मनसेच्या बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे नितीन सरदेसाईंकडून सभास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. अशातच मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE: मराठीसाठी एकत्र येणारे ठाकरे बंधू आता राजकीयदृष्ट्याही एकत्र येणार का? याची उत्सुकता लागली आहे. आजच्या मेळाव्यात मोठी घोषणा होणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Uddhav Thackeray Raj Thackeray Rally: 18 वर्षांनंतर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. विजयी मेळाव्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. हिंदीच्या मुद्यावर ठाकरी तोफा धडाडणार आहेत. मराठी अस्मितेसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असले तरीसुद्धा आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात आज घडणारी ही सर्वात मोठी घडामोड आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE Updates: मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो : राज ठाकरे