एक्स्प्लोर

Raj Thackeray Uddhav Thackeray: धन्यवाद देवा भाऊ.... तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ... शिंदेंच्या ठाण्यातील बॅनर्सचे फोटो व्हायरल

Shivsena & MNS: राजकीय वर्तुळात ठाण्यातील बॅनर्सची चर्चा. वाद संपले विश्वास वाढला महाराष्ट्राची नवी उभारी. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ठाण्यात झळकले मनसेचे बॅनर

Raj Thackeray & Uddhav Thackeray: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना  ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मेळावा घेतल्यानंतर आता मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ठाण्यामध्ये आता ठाकरे बंधू एकत्र येण्याचे बॅनर्स झळकू लागले आहेत. मनसेचे शाखाध्यक्ष संतोष निकम आणि उपशाखा अध्यक्ष अक्षय आंबेरकर यांनी ठाण्यातील महामार्गावर लावलेला भलामोठा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 'धन्यवाद देवा भाऊ....तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ... वाद संपले, विश्वास वाढला महाराष्ट्राची नवी उभारी..., असा मजकूर या बॅनरवर लिहला आहे. या फलकावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहेत. ठाकरे बंधूंनी निवडणुकीत एकत्रित येण्याचा निर्णय अद्याप जाहीर केला नसला तरी स्थानिक पातळीवर शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये एकत्र येण्याविषयी चैतन्याची भावना आहे. 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चा सुरु झाल्यापासूनच कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मुंबईच्या अनेक भागांमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जवळ येण्यास सुरुवात झाली होती. कालच्या मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर या प्रक्रियेला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. कालच्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी, 'एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठीच', असे वक्तव्य करुन जाहीरपणे मनसे आणि राज ठाकरेंशी दीर्घकालीन आणि शाश्वत स्वरुपाची युती करण्याची तयारी दाखवली होती. परंतु, राज ठाकरे यांच्या भाषणाकडे पाहता ते अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकीय युतीला तयार आहेत की नाही, याबाबत अद्याप राजकीय पंडितांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे आगामी दोन ते तीन महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Amit Thackeray: मुंबईत उबाठाच्या बॅनरवर राज ठाकरे-अमित ठाकरेंचा फोटो

"आजच दिवाळी आजच दसरा", अशा आशयाचे झळकले दादर सेनाभवन परिसरात बॅनर, शिवसेना ठाकरे गटाकडून ही बॅनरबाजी काल झालेल्या विजयी मेळाव्यानंतर करण्यात आली आहे. या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो पाहायला मिळत आहे. तसेच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचादेखील फोटो या बॅनर्सवर छापण्यात आला आहे.

Raj Uddhav Victory rally: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून एकमेकांचा 'सन्माननीय' उल्लेख

राज ठाकरे यांनी काल विजयी मेळाव्यात आपल्या भाषणाच्या सुरुवातीला 'सन्माननीय उद्धव ठाकरे', असे म्हटले. उद्धव ठाकरे यांनी राज यांना तशाचप्रकारचा प्रतिसाद दिला. उद्धव ठाकरे हे राज यांच्यापेक्षा आठ वर्षांनी मोठे आहेत. त्यामुळे वडिलकीच्या आणि मोठा भाऊ या नात्यामुळे ते राज ठाकरे यांचा उल्लेख कसा करतील, याची उत्सुकता होती. परंतु, उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, 'राजने मला सन्माननीय उद्धव ठाकरे म्हटले. साहजिकच त्याचे कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. म्हणून मी माझ्या भाषणाची सुरुवात 'सन्माननीय राज ठाकरे' अशी करतो, असे उद्धव यांनी म्हटले.

आणखी वाचा

राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंची मिठी; बाळा नांदगावकरांचा व्हिडीओ व्हायरल, स्टेजवर काय केलं?

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget