Bharat Gogawale on Raj Thackeray : "विधानसभा निवडणुकीला आणखी वेळ आहे. आमचे नेते बसतील, त्यातून मार्ग निघेल. जो मार्ग निघेल तो चांगला मार्ग निघेल. बऱ्याच ठिकाणी निवडणूक लढवण्यसाठी लोक इच्छुक आहेत. परंतु आणखी वेळ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र येऊन याबाबत चर्चा करतील. राजकारणात काहीही होऊ शकतं", असे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
ठाकरे गटाच्या आमदारांवर लवकर अपात्रतेची कारवाई करावी
ठाकरे गटाच्या आमदारांवर लवकर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी घेऊन शिंदे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या संदर्भात आमच्या बाजूने निकाल लागेल असे शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले. त्यांनी आमच्या व्हीपचे पालन केले नसल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी याचिका आम्ही हायकोर्टात केल्याचे भरत गोगावले म्हणाले आहेत. यासोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून भरत गोगावले यांनी अधिकाऱ्यांवर टीका केली.
मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बैठक व्हायची आहे
आम्ही योग्य विचार करून योजना आणली असून अधिकाऱ्यांनी ती राबवावी कारण मी सगळ्यांच्या हिताची योजना आहे, असे भोगावले म्हणाले. त्याचप्रमाणे अजून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बैठक व्हायची आहे, विधानसभेला अजून वेळ आहे. त्यामुळे आमच्या सोबत असतील असे मला वाटते, असे राज ठाकरेंच्या एकला चलो रे नाऱ्यावरून गोगावले म्हणाले. तसेच महाडमध्ये गेल्या दोन वर्षात आम्ही नद्यांचा गाळ काढण्याचे जे काम केले त्यामुळे यावर्षी अजून पर्यंत पूर आलेल्या नाही असेही गोगावले यांनी सांगितले.
मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर आगामी विधानसभेत कोणतीही युती नाही, असं म्हणत 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. तसेच 10 ऑगस्टपासून मी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती देखील राज ठाकरेंनी दिली. काल आढावा घेत होतो. कळेना कोण कुठे आमदार आहे. पुढे राजकीय घमासान होईल न भविष्य ना भूतो असेल. मला कळलं आपले लोकं काही कुठे जाणार आहेत तर मीच रेड कार्पेट टाकतो. त्यांचच खरं नाही तर तुम्हाला कुठे बसवतील, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या