Sanjay Jagtap on Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुरंदर-हवेलीच्या प्रश्नासंदर्भात आमदार संजय जगताप  यांच्या अनुपस्थितीत सह्याद्री अतिगृहावरती बैठक घेतली. त्यामुळे  संजय जगताप (Sanjay Jagtap) आता आक्रमक झाले आहेत. आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात विशेष अधिकार भंग  व अवमानाची कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री यांनी लोकप्रतिनिधींचा आवमान केला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी संजय जगताप यांनी आपले विशेष अधिकार वापरत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदर आणि हवेलीच्या प्रश्नसंदर्भात सह्याद्री अतिगृहावर बैठक बोलावली होती. परंतु त्याच दिवशी आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत सासवड येथे आमसभा पार पडणार होती. म्हणून ही बैठक पुढे ढकलावी अशी मागणी आमदार संजय जगताप यांनी केली होती. परंतु माजी आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आल्यानं आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. आज सासवड मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.


संजय जगताप काय काय म्हणाले ?


संजय जगताप म्हणाले, साडेसात तासानंतर आपली पुरंदर तालुक्याची आम सभा संपली. एक महत्वाची गोष्ट मला आपल्या सर्वांच्या लक्षात आणून द्यायची आहे. मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयातून मुख्यमंत्री शिंदेंचा दिनक्रम आलाय. यामध्ये पुरंदर हवेलीच्या प्रश्नाबाबत बैठक सह्याद्री अतिग्रहामध्ये मलबार हीलला मुख्यमंत्र्यांनी लावली असल्याचे सांगण्यात आलं. हे समजल्यानंतर मी त्यांच्या पीए शी बोललो. पुरंदरच्या प्रश्नाबाबत त्यांनी मीटींग लावली. मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे. आपण मीटींगची तारीख पुढे ढकलावी. कारण एक महिन्यापूर्वी मी पुरंदर तालुक्याची आम सभा लावली होती. हे जे प्रश्न आहेत, ते माझ्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे ती मीटींग आपण पुढे ढकलावी. परंतु दर्दैव असं आहे की, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ती मीटींग रात्री घेण्यात आली. 


माझा कोणावर टीका करण्याचा स्वभाव नाही, परंतु ही दुर्दैवी घटना आहे


एका लोकप्रतिनिधीच्या अधिकारांची कुंचबना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून होतं आहे. आम्ही मुख्यमंत्री महोदयांचा मान सन्मान ठेवतो. त्यांनीही या तालुक्याचा लोकप्रतिनीधी म्हणून आमचा मान सन्मान ठेवला पाहिजे. तालुक्याची आम जनता बैठकीसाठी उपस्थित असताना त्यांनी बैठका घेण्यात आल्या. माझा कोणावर टीका करण्याचा स्वभाव नाही. परंतु ही दुर्दैवी घटना आहे, असंही संजय जगताप यांनी म्हटलंय. 






इतर महत्वाच्या बातम्या


Narayan Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना चांगल्या भाषेत बोलता येत नाही, त्यांना बजेट वाचायचं असेल तर मी टिपणं देईल : नारायण राणे