एक्स्प्लोर

Raj Thackeray on Kabutar Khana: घरात उंदीर झाले तर आपण गणपतीचं वाहन म्हणून ठेवतो का, मग जैनांना कबुतरांचं.... राज ठाकरेंचं कबुतरखान्यावर सडेतोड भाष्य

Raj Thackeray on Kabutar Khana: मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला होता. जैन मुनींनी कोर्टाचा आदेश मानत नाही असे सांगत शस्त्र उचलण्याची भाषा केली होती.

Raj Thackeray on Kabutar Khana: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरुन पेटलेल्या वादाबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरुन राजकीय वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आम्हाला कुठे प्रतिसाद द्यायचा, हे कळते. काही जणांना कबुतरांचा (Pigeons) मुद्दा वाद होईल, अशा पद्धतीनेच लावून धरायचा होता. मात्र, त्यांना लक्षात आले की, आमच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्षा बंगल्यावरुन जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत राजकीय मुद्द्यांवर बोलतील, अशी अपेक्षा होती. परंतु, राज ठाकरे यांनी राजकीय भाष्य करणे पूर्णपणे टाळले. बेस्ट पतपेढीची निवडणूक फारशी महत्त्वाची नसल्याचे आणि त्याबाबत मला माहितीही नव्हते, असे मोघम उत्तर राज ठाकरे यांनी दिले. मात्र, या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मुंबईत कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या वादाबाबत भाष्य केले. (Mumbai Kabutar Khana)

राज ठाकरे यांनी रस्त्यांवर कबुतरांना खाणे घालण्याचा आग्रह धरणाऱ्या जैन समाजाला (Jain Community) कानपिचक्या दिल्या. त्यांनी म्हटले की, मला एक गोष्ट कळत नाही. तुमच्या घरात चार उंदीर झाले तर आपण  काय करतो, नाय नाय, गणपतीचं वाहन आहे म्हणून आपण घरात उंदीर ठेवतो का? मग असे कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात, अशी खोचक टिप्पणी राज ठाकरे यांनी केली. माणसं मेलेली चालतात, कबुतरं मेली नाही पाहिजेत. आज रेल्वेखाली, खड्यात माणसं जातात, माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील कबुतरखाने बंद करावेत, ही मागणी लावून धरली होती. मुंबई महानगरपालिकेने अलीकडेच हायकोर्टाच्या आदेशानुसार कबुतरखाने बंद करायला सुरुवात केली होती. तसेच रस्त्यांवर कबुतरांना धान्य टाकणाऱ्यांवर कारवाई सुरु केली होती. मात्र, दादरमधील कबुतरखाना बंद करण्यास स्थानिक जैन समाजाने विरोध केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने कबुतरांना रस्त्यावर खाणे घालण्यावरील बंदी कायम ठेवली होती.

आणखी वाचा

राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे आराखडाच घेऊन पोहचले; 'वर्षा'वरील बैठकीत काय काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंनी शिंदेंची हकालपट्टी केली होती, मग विधानसभा अध्यक्षांनी त्यांना पक्षाचा नेता कसा ठरवला? कपिल सिब्बलांकडून नार्वेकरांच्या निर्णयाची चिरफाड
ठाकरेंनी शिंदेंची हकालपट्टी केली होती, मग विधानसभा अध्यक्षांनी त्यांना पक्षाचा नेता कसा ठरवला? कपिल सिब्बलांकडून नार्वेकरांच्या निर्णयाची चिरफाड
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget