Raj Thackeray : ''प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र मशिदींवरील लागलेले भोंगे खाली उतरावावे लागतील, हा निर्णय सरकारने घ्यावा लागले. निर्णय नाही घेतला तर मशिदींसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावावे. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे,'' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महविकास आघाडी सरकारला दिला आहे. शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. 


धर्म बनला तेव्हा लाऊडस्पिकर होता का? 


राज ठाकरे म्हणाले आहेत की, मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे. माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. मात्र तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. सकाळी पाच वाजल्यापासून त्रास होतो. कोणत्या धर्मात लाऊडस्पीकर लिहिलं आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांमध्ये बघा. कुठेही तुम्हाला लाऊडस्पीकर दिसणार नाही. तुमच्या परमेश्वरांशी प्रार्थना करायची असल्यास करा, मात्र घरात असं ते म्हणाले आहेत.


मला आरे ला कारे करणारे माणसे हवीत


राज ठाकरे म्हणाले आहेत की, प्रत्येकाने आपला धर्म हा घरात ठेवला पाहिजे. आमच्याकडे मंदिरे आहेत. टाका धाडी. काहीच मिळणार नाही. म्हणून मला जातीत खितपत पडलेला, असा हतबल पडलेला, सत्तेसमोर लाचार झालेला समाज मला आवडत नाही. अशांचं नेतृत्व मला करायचं नसल्याचं ते म्हणाले आहेत. ते म्हणाले, मला आरे ला कारे करणारे माणसे पाहिजेत.'' दरम्यान, येत्या महानगर पालिकांच्या निवडणुकीत मनसे मराठीच्या मुद्दयांसह हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरणार असल्याचं आज राज ठाकरे यांच्या भाषणातून स्पष्ट झालं आहे. 


संबधित बातम्या: 


Raj Thackeray: जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार - राज ठाकरे
Raj Thackeray : अजित पवार पळून कुणासोबत गेले? लग्न कुणासोबत केले? - राज ठाकरेंचं टीकास्त्र
Raj Thackeray: मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कुठली शिक्षा करणार? राज ठाकरे यांचा मविआ सरकारला सवाल