Mumbai: मुंबईकरांचा पाडवा गोड झाला आहे. कारण आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A'या मार्गाचे लोकापर्ण करण्यात आले. मेट्रोच्या या दोन मार्गिका सुरू झाल्याने मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचाही प्रश्न सुटणार आहे. आज रात्री आठ वाजेपासून मुंबईकर या नवीन मेट्रो सेवांचा लाभ घेऊ शकतात. यावरच बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत की, मुंबई शहरात अशा या विकासाच्या गुढ्या पुढे ही उभारल्या जाणार आहेत. येणार काळात उरलेले मेट्रो प्रकल्प आणि कोस्टल रोड प्रकल्प या योजना देखील तातडीने मार्गी लावल्या जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

  


या नवीन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह अजित पवार आणि इतर मंत्र्यांनी नवीन मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. यावरच बोलताना अजित पवार म्हणाले की, आज मेट्रोचा प्रवास केल्यानंतर मुंबईकरांच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्यात ही मेट्रो सेवा आणि महाविकास आघाडीचे सरकार यशस्वी होणार, असं ते म्हणाले


सुख म्हणजे काय असतं? अजित पवार म्हणाले 


सुखाचे दिवस म्हणजे नेमके काय असतात यावर बोलताना अजित पवार म्हणाले, सुखाचे दिवस म्हणजे नेमके काय असतात, तर यात लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे. प्रवासासाठी रेल्वे, मेट्रो, मोनोरेल सारख्या सार्वजनिक सुविधा मिळायला हव्यात. तसेच आणि परवडणाऱ्या किंमतीत अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आरोग्याच्या सुविधा या जनतेला द्यायला हव्यात, असं ते म्हणाले आहेत. अजित पवार पुढे म्हणाले, ''सरकार आपल्यानंतर जगात देशात आणि राज्यात कोरोना संकट आले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत असताना विकास कामात कोणताही अडथळा येऊ नये, असा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला.''


संबधित बातम्या: 



CM Uddhav Thackeray : संघर्षाची वेळ आणू नका; मुख्यमंत्री उद्धव यांचा भाजपला इशारा


Mumbai Metro: राज्य सरकारच मुंबईकरांना गिफ्ट! मुख्यमंत्र्यांकडून मेट्रोला हिरवा झेंडा