Raj Thackeray: ''महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, दोन नंबरचा पक्ष शिवसेना आणि तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी, असं असताना तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारांसोबतच देशाच्या राजकारणात असा प्रकार पाहिला नाही'', असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.


व्यासपीठावरून एकमेकांना शिव्या घालता, नंतर एकमेकांच्या मांडीवर बसायचं


शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष करत राज ठाकरे म्हणाले की, ''व्यासपीठावरून तुम्ही एकमेकांना शिव्या घालता, नंतर जाऊन तुम्ही एकमेकांच्या मांडीवर बसता.'' शिवसेना-भाजप युती तुटली यावर बोलता ते म्हणाले, अडीज वर्षाचं कारण सांगणात युती तोडली. या तुमच्या आपसातल्या गोष्टी आहे, याशी आमचा काय संबंध. ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलं ते भाजप-शिवसेना युती म्हणून केलं. शरद पवार आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी म्हणून केलं नव्हतं. या मतदारांशी गद्दारी करणाऱ्याला कोणती शिक्षा देणार, असा प्रश्न त्यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे. 


राऊतांवर नाव न घेता टीका


यावेळी नागरिकांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, ''दोन-दोन तास रांगेत उभे राहून मतदान केलं. भाषणाला गेला. भाषणे ऐकली. विचार ऐकले. मतदान केलं. आणि मतदान केल्यानंतर महाराष्ट्रात चित्र वेगळंच दिसलं. यासाठी मतदान करता. गुलाम आहेत यांचे? कोणीही तुम्हाला कुठे ही फरफटत घेऊन जावे आणि तुम्ही जावं. तुम्ही हे सर्व विसरून जाताना, हेच हवं आहे यांना.'' शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता राज ठाकरे म्हणाले की, रोज सकाळी मीडिया वाले आले की, नुसतं आपलं बडबडत करत सुटायचं.''


संबधित बातम्या: 


Raj Thackeray On Mosque: 'ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्याच्या समोर हनुमान चालिसा लावू', राज ठाकरे यांचा इशारा
Raj Thackeray: जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार - राज ठाकरे
Raj Thackeray : अजित पवार पळून कुणासोबत गेले? लग्न कुणासोबत केले? - राज ठाकरेंचं टीकास्त्र