एक्स्प्लोर

ब्रँड ठाकरेंच्या ग्रँड सोहळ्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; जाहीरपणे दिलगिरी

राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून थेट इशाराच दिला होता. कोण नाही येत मी बघतोच, असे म्हणत कोण कोण मोर्चाला येत आहे तेही मी लक्षात ठेवेन असं म्हटलं होतं.

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर आज तब्बल 19 वर्षानंतर मुंबईत (Mumbai) ठाकरे बंधू एकत्र आले. या मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मराठीच्या मुद्द्यावरुन भाषण करत उपस्थितांची मने जिंकली. तर, राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाषण करुन राजकीय फटकेबाजी केली. उद्धव ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन भाजप आणि मोदी सरकारला लक्ष्य केलं. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवरही बोचरी टीका केली. दरम्यान, दोन्ही नेत्यांच्या भाषणानंतर राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन पाठिंबा देत मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठावर बोलावलं. मात्र, तरीही ज्यांची नाव घ्यायचं राहिलं, त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत फेसबुक पोस्ट केली आहे. 

राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून थेट इशाराच दिला होता. कोण नाही येत मी बघतोच, असे म्हणत कोण कोण मोर्चाला येत आहे तेही मी लक्षात ठेवेन असं म्हटलं होतं. त्यानुसार, आजच्या विजयी जल्लोष मेळाव्यात मराठी सेलिब्रिटी अन् कलाकारांची गर्दी पाहायला मिळाली. अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, अभिनेता सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, चिन्मयी सुमित हे कलाकार पाहायला मिळाले. यांच्यासह अनेकही कलाकार मोठ्या संख्येने मेळाव्यात उपस्थित होते. विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आणि आमदार, खासदारही या सोहळ्यात उपस्थित राहिले. राज ठाकरेंनी उपस्थित नेत्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचे आभार मानले. त्यामध्ये, रासपचे महादेव जानकर, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, कम्युनिष्ट पक्षाचे जयंत पाटील, प्रकाश रेड्डी यांसह विविध नेते व्यासपीठावर होते. राज ठाकरेंनी या सर्वांचे आभार मानले. मात्र, उपस्थित कलाकार आणि माध्यमांचे विशेष आभार मानत दिलगिरी व्यक्त केली आहे. 

''हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं, त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून  गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार,'' अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरेंनी आपल्या भाषणानंतर केली आहे.

एकजूट अशीच कायम राहील

दरम्यान, मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील, पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो, असेही राज ठाकरेंनी म्हटले. 

हेही वाचा

Video: राज ठाकरेंशेजारी आदित्य, तर उद्धव काकांजवळ अमित; सुप्रिया सुळेंनी बजावली आत्याबाईंची भूमिका

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget