Rahul Gandhi : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) पक्षाने 39 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पुन्हा एकदा वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, या वेळेस राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण काँग्रेसने केवळ 39 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अमेठीचा (Amethi) उमेदवार काँग्रेसने जाहीर केलेला नाही. 


दक्षिणेचा गड राखण्यासाठी राहुल गांधी वायनाडमधून पुन्हा रिंगणात


राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूक वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. यावेळेसही ते वायनाडमधून उमेदवारी दाखल करणार आहेत. भाजपने उत्तर भारतात काम वाढवले. वारणसी आणि उत्तर प्रदेशला भाजपने आपला गड बनवलय. त्यानंतर काँग्रेस पक्षाने आणि राहुल गांधी यांनी दक्षिण भारताकडे लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. तेलंगणा विधानसभाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे दक्षिणकडे लक्ष केंद्रीत करत असतानाच उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यातून राहुल गांधी पुन्हा एकदा मैदानात उतरणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


स्मृती इराणींचे राहुल गांधींना आव्हान 


दोन दिवसांपूर्वीच स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना आव्हान दिले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी आणि मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या काळातील कामांवर सर्वांसमोर चर्चा करुया, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं होतं. शिवाय, राहुल गांधी भाजपच्या सामन्य कार्यकर्त्यापुढेही टिकणार नाहीत, असा दावाही इराणी यांनी केला होता. 


भाजपकडून स्मृती इराणींना अमेठीतून उमेदवारी  


भाजपने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना भाजपने पुन्हा एकदा अमेठीतून लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. 2019 मध्ये याच मतदारसंघातून त्यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी असा सामना पाहायला मिळणार अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात होती. 


2019 मध्ये अमेठी मतदारसंघात राहुल गांधींचा पराभव 


2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि स्मृती इराणी याच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा दारुण पराभव केला होता. महाराष्ट्रातही काँग्रेसची केवळ एकच जागा निवडून आली होती. दरम्यान, आता 5 वर्षानंतर राहुल गांधी आणि स्मृती इराणी (Smriti Irani) पुन्हा एकदा आमने-सामने येणार का? याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Congress List : लोकसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधींसह भूपेश बघेल लोकसभेच्या रिंगणात, पहिले 39 उमेदवार कोण?