नवी दिल्ली : भाजपने लोकसभेसाठी आपले पहिले 195 उमेदवार जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसच्याही उमेदवारांची यादी (Congress Candidate List) समोर आली आहे. त्यामध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi)  हे केरळच्या वायनाडमधून लोकसभेच्या रिंगणात असतील, तर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) हे राजनंदगडमधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसच्या या संभाव्य यादीत एकून 39 उमेदवारांचे नाव असून महाराष्ट्रातल्या एकाही जागी अद्याप उमेदवारी देण्यात आली नाही. 


 






अमेठीमधून कोण? प्रियंका गांधींना कुठून उमेदवारी? 


राहुल गांधी हे केरळमधील वायनाडमधून लढणार असल्याने अमेठीमधून कोण उभं राहणार हे अद्याप अस्पष्ट आहे. या ठिकाणाहून प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. रायबरेलीमधूनही प्रियंका गांधी यांच्या नावाची चर्चा आहे. 


शशी थरूर पुन्हा तिरुवनंतपूरमधून लढणार


काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत खासदार शशी थरूर हे तिरुवनंतपुरममधून निवडणूक लढवणार आहेत. तर छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, ताम्रध्वज साहू, ज्योत्स्ना महंत आणि शिव देहरिया यांचा अनुक्रमे राजनांदगाव, दुर्ग, कोरबा आणि जांजगीर-चंपा मतदारसंघातून विचार करण्यात आला. 


कर्नाटकमधील आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अद्याप चार ते पाच जागांवर अंतिम निर्णय झालेला नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पारंपरिक गुलबर्गा या मतदारसंघातून यावेळी त्यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी हे तिकीटासाठी आग्रही असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. 


काँग्रेसच्या 39 उमेदवारांच्या या पहिल्या यादीत 15 उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत, तर 24 उमेदवार मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजातील आहेत.


काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत आणखी कोणाला स्थान मिळाले?


काँग्रेसने पहिल्या यादीत छत्तीसगडमधून सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. त्यात जांजगीरमधून शिव दहरिया, कोरबामधून ज्योत्स्ना महंत, दुर्गमधून राजेंद्र साहू, रायपूरमधून विकास उपाध्याय आणि महासमुंदमधून ताम्रध्वज साहू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


काँग्रेसने केरळमध्ये कोणाला दिले तिकीट?


कासारगोडमधून राजमोहन उन्नीथन, कन्नूरमधून के सुधाकरन, वडकारामधून शफी पारंबिल, वायनाडमधून राहुल गांधी, कोझिकोडमधून एमके राघवन, पलक्कडमधून व्हीके श्रीकंदन, अलाथूर-एसीमधून रम्या हरिदास, त्रिसूरमधून के मुरलीधरन, चालकुड्डीमधून बेनी बेहनन, हिलाकुडी इथून एम.के. इडुक्कीमधून ईडन, इडुक्कीमधून डीन कुरियाकोसे, अलप्पुझामधून केसी वेणुगोपाल, मावेलिक्करा-एसीमधून कोडिकुनिल सुरेश, पथनामथिट्टामधून अँटो अँटोनी, अटिंगलमधून अदूर प्रकाश आणि तिरुवनंतपुरममधून शशी थरूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


ही बातमी वाचा: